Breaking News

आशिष शेलार यांच्या मागणीवर विधानसभाध्यक्षांचे आदेश, जरांगे पाटीलांची एसआयटी चौकशी करा

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्न रखडण्यास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच आंदोलक फुटत नसल्याने आपल्यावर विष प्रय़ोग आणि एन्कांऊटर कऱण्याचा डाव असल्याचा खळबळजनक आरोपही केला. तसेच त्यानंतर माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्र बेचिराख होई अशी अशी भूमिका घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोडणार नाही असा इशाराही दिला. त्यातच एका याचिकेवर सुणावनी घेताना उच्च न्यायालयानेही मराठा आंदोलनप्रश्नी झलेल्या हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत अशी प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांवर उचित कारवाई करण्याचे निर्देश दिले. हाच मुद्दा पॉंईट ऑफ इन्फॉरमेशनच्या अंतर्गत भाजपाचे आशिष शेलार यांनी उपस्थित करत या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी कऱण्याची मागणी केली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना उबाठाचे पत्रकार पोपटलाल (संजय राऊत) यांनी भाजपा एका रात्रीत संपून जाईल, नामशेष होईल असे वक्तव्य केले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र बेचिराख करण्याचे वक्तव्य केले. तसेच आम्ही महाराष्ट्राला बेचिराख होण्यापासून वाटविले असे वक्तव्य केले. याशिवाय राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अश्लाघ्य आरोप केले. त्यामुळे राज्यातील विरोधकांच्या तोंडी असलेल्या राजकिय विरोधाची भाषा मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडी कशी असा सवाल उपस्थित करत या मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याची चौकशी एसआयटी मार्फत करून त्यांच्या वक्तव्याच्या मागे नेमके कोण याचा पदार्फाश झाला पाहिजे अशी मागणी केली.

मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावरून सभागृहात सत्ताधारी विरूध्द विरोधक असा सामना चांगलाच रंगल्याचे चित्र विधानसभेत पाह्यला मिळाले.

त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना बोलण्याची संधी दिली. त्यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन सुरु होते. त्यावेळी हे आंदोलन सुरु असल्याची माहिती महाराष्ट्रातील कोणालाही नव्हती. मात्र पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि हे आंदोलन महाराष्ट्रातील जनतेला कळाले. त्यानंतर वाशीमध्ये आंदोलक पोहोचले. त्यावेळी गुलाल उधळला गेला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांनी गळाभेट घेतल्याचे प्रसारमाध्यमातून पाहिले-वाचले. परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दलचा तो गुलाल होता याची माहिती आम्ही आमदारांना नव्हती. की कोणी आम्हाला राज्याला विश्वासात घेतले जात नव्हते. परंतु मराठा आंदोलनाच्या प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर सदस्य मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी जात होते. पण ते का जात आहेत कशासाठी जात आहेत याची सविस्तर माहितीही सरकारकडून आम्हाला मिळत नव्हती. त्यामुळे मराठा समाजाचे जे आंदोलन सुरु आहे ते आंदोलनाच्या पध्दतीने सुरु आहे. तसेच या आंदोलकांवर जे आरोप झाले त्या आरोपांना आंदोलकांकडूनही उत्तर दिले जात आहे. परंतु त्या व्यतीरिक्त जो काही हिंसाचार झाला, महाराष्ट्र बेचिराख करण्याची करण्याचा किंवा बीडमधील हिंसाचार आदी गोष्टी या बेकायदेशीर असून त्याचे कोणी समर्थन करूच शकणार नाही अशी भूमिका मांडली.

त्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही विरोधकांची बाजू मांडताना मनोज जरांगे पाटील यांना ओबीसी समाजाच्या विरोधात कोण जाणीवपूर्वक उचकावत होतं, तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कोणत्या नेत्याकडून जाणीवपूर्वक हवा देण्यात येत होती. या सगळ्या गोष्टींचा तपास झाला पाहिजे. त्याबाबत सरकारने निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी केली.
त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने विजय वडेट्टीवार म्हणाले की, जरांगे पाटील यांना कोणी मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आरोपाच्या मुळाशी कोण आहे या सगळ्या गोष्टींची माहिती पुढे आली पाहिजे अशी आग्रही मागणीही यावेळी केली.

यावेळी सत्ताधारी बाकावरील सदस्य आक्रमक होत मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी मार्फत चौकशीची मागणी करण्यास सुरुवात केली. अखेर सभागृहातील गोंधळ वाढल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपा आणि इतर ओबीसी समाजाच्या आमदारांची घरे जाळली. ही घरे जाळण्यास कोणत्या नेत्याने सांगितले याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.

त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या भाजपाचे आमदार आशिष शेलार, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनीही भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे या सर्व भूमिकांची दखल राज्य सरकारने घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी असे आदेश दिले.

Check Also

नाना पटोले यांचे टीकास्त्र, नरेंद्र मोदी फेल झालेले इंजिन…

नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *