Breaking News

राज्यसभेला भाजपाच्या उमेदवाराला मतदान करणारे काँग्रेसचे ६ आमदार अपात्र

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणूकीत हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या ६ आमदारांनी भाजपाच्या उमेदवारांना मतदान केले होते. त्यामुळे हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर फक्त उमेदवार निवडूण गेला. परंतु पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. यापार्श्वभूमीवर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सखू यांनी या सहा आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रततेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेत भाजपाच्या त्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या ६ आमदारांना मात्र अपात्र ठरविण्यात असल्याचा निकाल दिला. त्यामुळे आगामी काळात हिमाचल प्रदेशातील सत्तासंघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यसभा निवडणूकीच्या निमित्ताने हिमाचल प्रदेशातील जनतेने निवडूण दिलेले काँग्रेसचे सरकार उलथवून टाकण्यासाठी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी परिस्थिती अनुकूल व्हावी यासाठी केंद्रीय पातळीवरून मोठ्या प्रमाणावर हालचाली झाल्या. परंतु भाजपाला डाव उलटून लावण्यात सध्या तरी काँग्रेसला यश आले आहे. मात्र अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या निमित्ताने आणि राज्यसभा निवडणूकीत पक्षाचा व्हिप डावलून भाजपाला मतदान केल्याची माहिती उघडकीस आली. यासंदर्भात काँग्रेसचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सखु यांनी त्या ६ आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. त्यावर विधानसभा अध्यक्ष कुलदीप पठाणीया निर्णय घेत पक्षादेशाच्या व्हिपचा अनादर केल्याप्रकरणी या सहा आमदारांना अपात्र ठरविले. यात राजींदर राणा, सुधीर शर्मा, इंदर दत्ता लाखनपाल, रवि ठाकूर, चैतन्य शर्मा, देवेंद्र भूट्टो या सहा आमदारांना अपात्र ठरविण्यात आले.

यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष कुलदीप पठाणीया म्हणाले की, निवडणूकीसाठी अर्थसंकल्पिय अधिवेशनासाठी पक्षाकडून त्यांच्या आमदारांसाठी व्हिप जारी केला जातो. त्यानुसार संबधित आमदारांनी त्या पक्षाच्या व्हिपचे पालन करणे आवश्यक असते. परंतु पक्षाने व्हिप जारी केलेला असतानाही त्या सहा आमदारांनी राज्यसभा निवडणूकीत मतदान केले. त्याचबरोबर अर्थसंकल्प काल सादर करण्यात येणार होता. त्यावेळीही ते ६ बंडखोर आमदार विधानसभेत गैरहजर राहिले होते. त्यामुळे त्यांचे कृत्य परिशिष्ट १० मधील तरतूदीचा भंग होतो की नाही यापेक्षा पक्षाने जारी केलेल्या व्हिपचे पालन केले नाहीत. त्यामुळे त्या सहा आमदारांवर पक्षाचा व्हिप पाळला नसल्याने अपात्र ठरविण्यात आले असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना विधानसभा अध्यक्ष कुलदीप पठाणीया म्हणाले की, ही अपात्रतेची कारवाई निर्णय जाहिर केल्यानंतर तात्काळ लागू करण्यात आल्याचेही सांगितले.

या सहा आमदारांनी भाजपाच्या हर्ष महाजन यांना मतदान केल्याने हिमाचल प्रदेशात काँग्रेसची सत्ता असतानाही काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव झाला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *