छगन भुजबळ यांचे आवाहन, शासन निर्णयाचा अभ्यास सुरू, तूर्त तरी उपोषणे थांबवा ज्येष्ठ विधीज्ञांची मदत घेऊन सरकारने काढलेल्या शासन निर्णयाचा अभ्यास करून पुढील पावले उचलणार

मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासंदर्भात सरकारने जो शासन निर्णय जारी केला आहे. त्याबद्दल आणि त्या शासन निर्णयामध्ये लिहिलेल्या काही वाक्य, काही शब्दाबद्दल संभ्रम आहेत यासाठी आम्ही जेष्ठ विधीज्ञांशी चर्चा करत आहोत. सध्या सुरू असलेला गणेशोत्सव पाहता आपल्या आंदोलनामुळे कुठेही कायदा व्यवस्था बिघडू नये यासाठी ओबीसी समाजाने आंदोलने अथवा उपोषणे स्थगित करावीत असे आवाहन राज्याचे मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले.

मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, माझे ओबीसी बांधवांना आव्हान आहे की सरकारने काढलेल्या शासन निर्णयाच्या बाबतीत आम्ही वकिलांशी सविस्तर चर्चा करत आहोत. या निर्णयामुळे ओबीसी घटकाचे नुकसान होते आहे असे मत जर विधीज्ञानी व्यक्त केले तर निश्चितपणे मोठी आंदोलने आपण उभारू. या शासनाने काढलेल्या शासन निर्णया मध्ये ओबीसी घटकाचे नुकसान होत असेल तर या विरुद्ध न्यायालयात देखील दाद मागू असेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, आज राज्यामध्ये विविध ठिकाणी ओबीसी संघटनांनी निदर्शने नोंदवली, आणि ठिकाणी या शासन निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व भावना लक्षात घेऊन आणि विधीज्ञांशी चर्चा झाल्यानंतर यातून योग्य असा मार्ग आपण निश्चितपणे काढू असे ठाम मत देखील व्यक्त केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा नाही नगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडे ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज; १२ तारखेच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *