Breaking News

मुंबई मनपा आर्थिक संकटात ;महापालिका आयुक्तांचे अतितात्काळ परिपत्रक मुंबई महानगरपालिकेचे खाजगीकरण करण्याचा भाजप- सेनेचा डाव असल्याचा नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकाचे ३० हजार कोटीचे बजेट असताना मनपा आर्थिक संकटात कशी येवू शकते असा सवाल करतानाच भाजप – सेना मनपाचे खाजगीकरण करण्याचा डाव आखत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान नवाब मलिक यांनी महापालिका आयुक्तांनी काढलेल्या ‘अतितात्काळ’ परिपत्रकाचा आदेश माध्यमांसमोर सादर केला.
मुंबई मनपा कार्यालयातून परिपत्रक पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये २०१९ – २० बजेटमध्ये महसुली उत्पन्नात घट व महसुली खर्चात वाढ झाल्यास मनपा आर्थिक संकटात येवू शकते. मग मनपाचे बजेटमधील पैसे खर्च झाले कुठे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
संपुर्ण मनपाचे खाजगीकरण करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. भाजपचे ठेकेदार प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. तर नीरज गुंडे हा प्रसाद लाड यांच्याजवळचा ठेकेदार असून तो सध्या मनपाची कामे घेत आहे. खाजगीकरण करुन मनपा आयुक्त व ठेकेदार मनपाच्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचे कटकारस्थान आहेत असा आरोपही त्यांनी केला.
प्रसाद लाड यांच्या जवळच्या ठेकेदारांना ठेका दिला गेला आहे. आता आयुक्तांनी काढलेल्या नोट मध्ये असा डाव असून थकीत कर वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय आयटी व तंत्रज्ञानाचा वापर करा असे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरुन नागपुरच्या कंपनीला म्हणजेच मुख्यमंत्री यांच्या जवळच्या कंपन्यांना कामे मिळावी यासाठी हे धोरण राबविले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई मनपाचे ३० हजार कोटी बजेट आहे, तर त्याचा लेखाजोखा द्या अशी मागणीही त्या मुंबई आयुक्तांकडे केली.
ज्यावेळी मुंबई तुंबली होती त्यावेळी खर्चात कमी केली का. मग मनपा आर्थिक संकटात कशी आली. मनपाचे ३० हजार कोटी कुठे गेले. मलनिस्सारण व्यवस्था, पाण्याची व्यवस्था चांगली नाही तरी करवसुली मनपाकडून केली जाते आहे. पाचशे फुटाच्या घरांना कर घेणार नाही असे जाहीर करण्यात आलेले असताना हा कर कमिशनर का घेत आहेत अशा प्रश्नांची सरबती करत भाजप- सेना मनपाला लुटत असल्याचा आरोप केला.
नीरज गुंडे हा दररोज कमिशनरच्या घरी, मुख्यमंत्री यांच्या घरी का जात असतो. प्रसाद लाड यांनाच का ठेका दिला जातोय असा असा सवाल करतानाच मुंबईकरांवर कर वसुलीचा डाव भाजप – सेना आखत असेल तर तो डाव हाणून पाडला जाईल असा इशाराही त्यांनी दिला.
कोण हा नीरज गुंडे दररोज कमिशनर, मुख्यमंत्री आणि मातोश्रीवर का दिसतो. मुंबईचे वाटोळे करण्यासाठी प्रसाद लाड आणि नीरज गुंडे यांना नेमले आहे का असा संतप्त सवालही करत जी गरजेची कामे सुरु आहेत ती होत नाहीत. मात्र लुट करण्याचे काम भाजप – सेना करण्यात येत आहे. जोपर्यंत याचा खुलासा होत नाही तोपर्यंत मनपा सभागृहात कामकाज चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
आज शिवसेना आमदार अमित घोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. आम्हाला मेगाभरती करायची नाही. दार उघडले तर अनेक सेना- भाजपचे लोक दारावर उभे आहेत. मात्र पवारसाहेबांनी पक्षातील लोकांना प्राधान्य देण्याचे ठरविल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *