Breaking News

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विलास वाघमारे कांस्य पदकाचा मानकरी ग्रीक रोमन कुस्तीत मिळविले कांस्यपदक

अखिल भारतीय नागरी सेवा कुस्ती स्पर्धा १६ ते १९ ऑक्टोबर २०२३ दरम्यान त्यागराज स्टेडियम, त्यागराजनगर दिल्ली, या ठिकाणी केंद्रीय सांस्कृतिक व क्रीडा विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आहेत. १८ ऑक्टोंबर रोजी ग्रीक रोमन कुस्ती प्रकारातील स्पर्धा पार पडल्या. यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असलेला पैलवान विलास वाघमारे याने ६० किलो वजन गटामध्ये कांस्यपदक पटकावले आहे. अखिल भारतीय नागरी सेवा कुस्ती स्पर्धेत विलास वाघमारे यांनी प्रथम फेरीत कर्नाटक राज्याच्या पैलवानावर चितपटीने विजय मिळवला, उपांत्य पूर्व फेरीत विलास वाघमारे यांना हरियाणा राज्याच्या पैलवान कडून गुनाधिक्याने पराभव स्वीकारावा लागला, त्यानंतर तृतीय क्रमांकाच्या लढतीमध्ये विलास वाघमारे याने केरळच्या पैलवानास चितपट करून कास्यपदक महाराष्ट्र राज्यासाठी प्राप्त केले आहे.

विलास वाघमारे हा वन विभाग महाराष्ट्र शासन वनरक्षक या पदावर सातारा येथे कार्यरत आहे. विलासच्या या उत्कृष्ट कामगरीबद्दल बजरंग क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा वाघिरा चे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ बांगर, सचिवालय जिमखाना मुंबईचे मानद सचिव कुस्ती संजय पोफळे, महाराष्ट्र शासन कुस्ती संघाचे प्रशिक्षक पांडुरंग पाटील, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, मानद सचिव संजय सोनवाणे, संजय कदम,राष्ट्रीय खेळाडू महेश घुले, महाराष्ट्र शासन वनविभागाचे मा.उपवनसंरक्षक श्रीमती अदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांझुरणे, वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे, वनपाल करुणा जाधव अंतरराष्ट्रीय खेळाडू फुलचंद बांगर, राष्ट्रीय खेळाडू वैजनाथ बांगर, राष्ट्रीय खेळाडू कुंडलिक बांगर यांनी अभिनंदन केले आहे.

Check Also

मुंबई उच्च न्यायालयाचे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या औरंगाबाद शहर आणि महसूल क्षेत्राचे अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *