Breaking News

सुषमा अंधारे यांची कायंदेवर खोचक टीका, एक पाय तुटल्याने…

शिवसेना ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत. शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यातच आमदार मनिषा कायंदे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. मनिषा कायंदे यांच्या पक्षप्रवेशावर आमदार संजय शिरसाट यांनी शिक्कामोर्तब केला आहे. यावरून ठाकरे गटाकडून मनिषा कायंदे यांच्यावर टीकास्र सोडलं जातं आहे. उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही मनिषा कायंदे यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे.
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, मराठवाड्यात एक म्हण आहे, एक पाय तुटल्याने गोम लंगडी होत नाही. एवढे सगळे शिवसैनिक आहेत. बचेंगे, लढेंगे औरं जीतेंगे भी. गेल्या तीन दिवसांत मंत्रालयातून ४० कोटींपेक्षा अधिक फाईल्स कोणाच्या क्लिअर झाल्या आहेत. त्यात किती आमदारांची नावे आहेत, हे एकदा आपण शोधावे. म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला उत्तरे मिळतील.

मनिषा कायंदेंच्या पक्षप्रवेशावर खासदार विनायक राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सत्तापिपासू, स्वार्थी आणि संधीसाधू विधानपरिषेदच्या आमदार शिंदे गटात जाणार आहेत. याची कल्पना आम्हाला दोन महिन्यांपासून होती. विधानपरिषदेवर पुन्हा संधी मिळण्यासाठी गद्दारी आणि बेईमानी केली आहे. यांना राजकारणात काडीचीही किंमत नव्हती, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. एवढा मोठा मानसन्मान प्राप्त करून दिला, असं विनायक म्हणाले.

आज शिवसेना पक्षाला गरज असताना उपकारकर्त्यांशी बेईमानी करून सत्तेसाठी राजकारणाच्या डबक्यात उडी मारत आहेत. तुम्हाला नियती कधीही माफ करणार नाही,” असा इशाराही विनायक राऊत यांनी दिला आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, सर्वसामान्यांची विकासकांनी अडवणूक करू नये

विलेपार्ले प्रेमनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसनाच्या जागेवर होत असलेली अतिक्रमणे तातडीने काढावीत आणि यासाठी जबाबदार असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *