Breaking News

संजय राऊत म्हणाले,…तर २४ तासात देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळे शिवसेनेत…

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे, उपनेते शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी उधाण आले. या घटनेचा धागा पकडत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, आम्हीही उद्या सत्तेत आल्यानंतर ईडी-सीबीआयचा वापर सुरु केल्यानंतर २४ तासात देवेंद्र फडणवीस शिवसेनेत येतील त्यांच्यानंतर नरेंद्र मोदी, अमित शाह शिवसेनेत प्रवेश करतील असे सूचक वक्तव्य करत त्या यंत्रणांच्या बळावर कोणी कोणावर दबाव आणून भाजपामध्ये प्रवेश करायलं लावतय अशी उपरोधिक टीका केली.

वरळी येथे शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय शिबीरानिमित्त आयोजित कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रकाश आंबेडकरांवरून उद्धव ठाकरेंना विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, बावनकुळे या माणसाला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. बावनकुळेंना महाराष्ट्र समजत नाही, विषय समजत नाही. हा प्रश्न त्यांनी प्रकाश आंबेडकर आणि कबरीवर जाऊन औरंगजेबाला विचारावा. त्यांच्याच राज्यात ती औरंगजेबाची कबर आहे.

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होणार होते या चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्यावरही संजय राऊत यांनी उत्तर देताना म्हणाले, बावनकुळे हे एक सदगृहस्थ आहेत. मात्र, त्यांना राजकीय ज्ञान नाही. त्यांना महाराष्ट्र माहिती नाही. त्यामुळे माध्यमांनी बावनकुळेंची वक्तव्ये फार गांभीर्याने घेऊ नयेत.

शिवसेनेच्या (ठाकरे गट) विधान परिषदेतील आमदार मनिषा कायंदे तीन नगरसेवकांसह शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी कोण हे आमदार असं विचारलं. तसेच अशा लोकांचा कचरा इकडे तिकडे उडत असतो, अशी टीका केली.अशा लोकांचा कचरा इकडे तिकडे उडत असतो. हवेचा झोका बदलला की हा कचरा पुन्हा आमच्या दारात येऊन पडतो. त्याकडे दुर्लक्ष करा. ते फार महान लोक नाहीत.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच दोन मेळावे होत आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांकडून आपलाच मेळावा खरा असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, शिवसेनेचे दोन मेळावे होत आहेत हे वक्तव्य चुकीचं आहे. याबाबत आदित्य ठाकरेंनी खूप चांगलं वक्तव्य केलं आहे. दुसरा मेळावा हा गद्दार दिनाचा मेळावा आहे. त्यांचा मेळावा शिवसेना दिनाचा नाही.

“ते ‘वाघ निघाले गोरेगावला’ असे बॅनर लावत आहेत. मात्र, त्यांची मराठी चुकते आहे. त्यांची शाळा घेतली पाहिजे. मी त्यांना शिकवतो. ‘वाघाचे कातडे पांघरलेले लांडगे निघाले गोरेगावला’ असं बॅनरवर लिहिलं पाहिजे. सगळे वाघ तर शिवसेनेच्या या शिबिरात आहेत, असं म्हणज संजय राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे तहहयात आमचे पक्षप्रमुख आहेत. त्यांना पक्षप्रमुख करण्याच्या ठरावाची गरज नाही. ते ठराव इथं होत नाहीत. या तांत्रिक गोष्टी पूर्ण होत असतात, असं म्हणत संजय राऊतांनी शिवसेना पक्षप्रमुखपदाच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

१६ ते २५ फेब्रुवारीदरम्यान खादी, सिल्क आणि विविध मराठमोळ्या खाद्यपदार्थांची मेजवानी

स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील जनतेला एका धाग्याने बांधण्याचे आणि स्वदेशीचा स्वाभिमान मनामनात जागवण्याचे काम खादी या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *