Breaking News

आदित्य ठाकरे यांचे शिंदे गटाला आव्हान, ….तर मी काहीही हरायला तयार

२० जून हा जागतिक खोके दिन आहे. कारण ज्या लोकांनी आपल्याशी गद्दारी केली त्यांच्या गद्दारीची दखल ३३ देशांनी घेतली असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. तसेच आम्ही जे मुंबईत काम केलय तसंच काम केल्याचं प्रेझेन्टेशन शिंदे गटातील कोणत्याही मंत्र्याने द्यावे मी काहीही हारायला तयार असल्याचे आव्हाही त्यांनी दिले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं शिबीर मुंबईत होतं आहे. या शिबीरात कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना आदित्य ठाकरेंनी ही टीका केली.

आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, या राज्यात काही लोक असे आहेत जे दुसऱ्यांचे वडील चोरणारे आहेत. दुसऱ्यांच्या वडिलांसह आपले फोटो टाकून आपलं राजकीय करिअर पुढे कसं न्यायचं हे या लोकांना माहित आहे. आज चांगला दिवस आहे आज कुणीही त्यांची नावं घेऊ नका. पण वर्षभरापूर्वी जेव्हा गद्दारी झाली तेव्हा माझ्या वडिलांचा फोटो आणि नाव नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र माझ्या वडिलांनी दाखवलं ते काय आहेत. माझ्या आजोबांच्या आशीर्वादाने लवकरच सगळं काही स्पष्ट होणार आहे.

तसेच शिंदे गटावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनेचा वर्धापन १९ जून रोजी आहे. पण काही लोकांनी आजच ट्वीट केलंय. घटनाबाह्य सरकारमधले उपमुख्यमंत्री त्यांनी उद्याच्या शुभेच्छा आजच दिल्या आहेत. दिल्लीतून त्यांना निरोप आला असेल. परवा म्हणजेच २० जूनला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. जागतिक खोके दिन. राष्ट्रीय नाही, राष्ट्रीय खोके दिवस म्हणू नका. जागतिक खोके दिन आहे कारण ३३ देशांनी त्याची दखल घेतली आहे. मी आत्ता लंडनमध्ये होतो. तिथे मला एकाने विचारलं की पुढे काय करणार आहात? तेव्हा मी सांगितलं की १८ तारखेला शिबीर आहे, १९ जूनला वर्धापन दिन आहे. २० तारखेला मी म्हटलं ५० खोके तेव्हा तिथून एक फॉरेनर चालला होता, तोपण म्हणाला एकदम ओके. त्यामुळे परवाचा दिवस हा जागतिक खोके दिवस आहे असा उपरोधिक टोलाही लगावला.

सरकार पडल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून हवेत हे लोकांच म्हणणं आहे त्यांचं मत आहे. परदेशात सुद्धा विचारत होते तुमचं सरकार कधी येणार ? त्यांना सुद्धा सरकार आपलं हवय प्रत्येकाला आपलं सरकार हवाय असे सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला आव्हान देताना म्हणाले, आज मी चॅलेंज देतोत. मी जे प्रेझेंटेशन देतोय जे आम्ही मुंबईत काम केलंय. असच प्रेझेंटेशन शिंदे गटांनी द्यावे की त्यांनी मुंबईत काय काम केलं ? मुंबईत जे काम झालाय. ते देशात कुठेही झालं नाही आणि जर झालं असेल तर मी काहीही हरायला तयार आहे असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले.

आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, मला पेंग्विन पेंग्विन ट्रोल केलं जातं. पण तसा पेंग्विन सारखा चालतय कोण ? हे मला माहित नाही. पण मला ट्रोलिंग आवडत, वाघ सुद्धा पाहायला एक तर मातोश्री वर लोक येतात नाहीतर झू ला मुंबईच्या येतात. शिक्षणाची पातळी बदलायची असेल तर कॉमन क्वालिटी शिक्षण आपण आणलं पाहिजे असे सांगत टॅब शिक्षण आपण आणले. दप्तराचे ओझं कमी केलं, ४० हजार विद्यार्थ्यांना आपण टॅब दिले त्यावर ते शिकले. जागतिक ट्रेंड आपण आणले आयसीएसई सीबीएसई सुरू केलं सगळे बोर्ड सुरू केले असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेंटच्या जुडियो सोबत सामंजस्य करार

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेंट च्या जुडियो सोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे आगामी पाच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *