Breaking News

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये तब्बल १७९७ ‘ही’ पदे रिक्त

मुंबई महानगरपालिकेतील शाळा अंतर्गत शिपाई, हमाल आणि माळी – रखवलदार यांची पदे मोठया प्रमाणावर रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस शिक्षणाधिकारी कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहिती उघडकीस आले आहे. पालिका शाळेत शिपाईची एकूण १७९७ पदे रिक्त आहेत. तर ३९१ हमाल आणि १२२ माळी नि रखवलदारांची पदे रिक्त आहेत.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे मुंबई महानगरपालिकेतील शाळा अंतर्गत रिक्त पदांची माहिती मागितली होती. मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी यांनी अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिकेतील शाळा अंतर्गत शिपाई, हमाल आणि माळी – रखवलदार या पदांची आकडेवारी उपलब्ध करुन दिली. यात शिपाईची एकूण मंजूर पदे २६३५ असून रिक्त पदांची संख्या १७९७ आहे. हमाल ही पदे ६०२ असून सद्या ३९१ पदे रिक्त आहेत तर माळी नि रखवलदारांची १२२ पदे रिक्त असून मंजूर पदांची संख्या २३१ आहे.

अनिल गलगली यांच्या मते प्रत्येक शाळेत शिपाई ही पदे महत्वाची असून आज मोठ्या प्रमाणावर ही पदे भरली गेली नाही. यामुळे शाळा स्तरावर दैनंदिन कामकाज करण्यासाठी अडचणी येतात. यावर्षी शिक्षण विभागाने निधी वाढविली असून रिक्त पदे तत्काळ भरणे आवश्यक आहे. अनिल गलगली यांनी पालिका आयुक्त यांस पत्र पाठवून मागणी केली आहे की महत्वाची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी.

माहिती अधिकारतून प्राप्त झालेली कागदपत्रेः-

Check Also

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातातील मृतांना ५ लाखांची मदत जखमींवर मोफत उपचार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

डोंबिवली (घेसरगाव) येथून खासगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांच्या वाहनाला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *