मुंबईनंतर सर्वाधिक गर्दी आणि वर्दळीचे शहर असलेल्या पुणे शहरातील स्वारगेट या प्रमुख एसटी बसस्थानकावर एका व्यक्तीने एका २६ वर्षिय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे पुणे शहर हादरले असून पुण्यात नेमकं पोलिसांच चाललय काय असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत असून पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
माध्यमांमधील वृत्तानुसार स्वारगेट स्थानकात फलटणला जाणाऱ्या एका २६ वर्षिय तरूणीने गाडीची विचारणा एकाकडे केली. त्यावर संबधित व्यक्तीने त्या मुलीला फलाटावर लागलेल्या सोलापूर-पुणे शिवशाही या मुक्कामी एसटीत बसायला सांगितले. गाडीतील लाईट बंद असतानाही ती मुलगी एसटी जाऊन बसली. त्यानंतर संबधित व्यक्तीने शिवशाही एसटीत बसलेल्या त्या २६ वर्षिय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही घटना पहाटे साडेपाचची असल्याचे सांगण्यात येत असून घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी संबधित आरोपीचा स्केच जारी केला असून त्याचे नाव गाडे असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या संशयित आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून ७ ते ८ पथक पाठविण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.
पोलिसांनी याप्रकरणी बसस्थानक प्रमुखांवर आणि गाडीच्या वाहकावर गुन्हा दाखल केल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान संशयित आरोपीला पकडण्यासाठी आणि आरोपीचा ठावठिकाणी शोधण्या कामी संशयित आरोपीच्या भावाला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्याच्या मामाला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
अतिशय संतापजनक!
स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची…— Supriya Sule (@supriya_sule) February 26, 2025
या घटनेवर पुणे जिल्ह्याचे पालकममंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्य पद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात येत आहे. खाकी वर्दीचा धाक का राहिला नाही गुन्हेगारांकडून अशी कृत्ये होतात कशी असा सवालही विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. यासंदर्भात रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत राज्य सरकारला सवाल केला आहे. तसेच पुणे पोलिस योग्य सुरक्षेची जबाबदारी पार पाडत नसतील त्यांना हटविण्याची मागणी केली.
Marathi e-Batmya