Breaking News

मुंबई

पर्यटन व्यवसायात महिलांना अधिक वाव देण्यासाठी “आई” पर्यटन धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय

महिलांना पर्यटन व्यवसायात अधिकाधिक वाव मिळावा आणि त्यांचे सक्षमीकरण व्हावे म्हणून “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत“आई” हे महिला केंद्रित (Gender Inclusive) पर्यटन धोरण राबविण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्याचप्रमाणे काही पर्यटन स्थळी महिला बाईक-टॅक्सी सेवा सुरु करण्यास सुद्धा यावेळी मान्यता देण्यात आली. …

Read More »

स्वच्छ मुख अभियानाचे सचिन तेंडुलकर सदिच्छादूत निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपणे महत्त्वाचे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) म्हणून करार केला असून त्यांच्या आवाहनाला तरुणांसह सर्व स्तरातील नागरिकांमध्ये जनजागृती होवून अभियान अधिक यशस्वी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन करून निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपणे महत्त्वाचे असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण व औषधी …

Read More »

शरद पवार यांनी मच्छिमार महिलांना दिले ‘हे’ आश्वासन तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या काळात तुमच्या पाठिशी उभे राहणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी प्रयत्न करणारा, त्यांचे सुख-दुःख समजून घेणारा, प्रसंगी अडचणीत मदत करणारा पक्ष आहे. त्यामुळे साहजिकच तुम्ही सर्वजण आणि सहकारी करत असलेल्या कष्टांची नोंद घेतल्यानंतर तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या काळात तुमच्या पाठिशी उभे राहणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, प्रत्येक विभागांच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमा कोकणात आपत्ती सौम्यीकरणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचेही निर्देश

विविध नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे तसेच पालिकांनी देखील त्यांच्या स्तरावर आपत्तीत तत्काळ बचाव कार्य करणारी पथके तयार करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत …

Read More »

निर्मला सीतारमण यांचा दावा, ९ वर्षांत देशाला मोदींनी दहशतवादापासून मुक्त… मोदी सरकारने गोरगरिबांना विकासाच्या प्रवाहात आणले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ९ वर्षांत देशाची सर्वांगीण प्रगती करत असताना, देशातील गोरगरीब, वंचित, शोषित वर्गालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक विकासाचा नवा मापदंड तयार केला, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी केले. मोदी सरकारच्या ९ वर्षांतील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत …

Read More »

रोहित पवार यांचा त्या कार्यक्रमावरून सवाल, बोलघेवडे चॉकलेट बॉय आता गप्प का? सावरकरांसाठी राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटविले

देशाच्या नव्या संसदेचे उद्घाटन होत असतानाच भारतातील १९ राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. त्यामुळे देशातील विरोधी पक्षाकडून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यातच दिल्लीतील महाराष्ट्र सदनामधील स्वातंत्र्यवीर सावरकर जंयतीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्यात आल्याने राज्यातील काँग्रेससह राष्ट्र्वादी काँग्रेसने केंद्र सरकारवर आणि …

Read More »

पप्पू कलानी यांची सून पंचम कलानी म्हणाल्या, शरद पवारांना सांगूनच….. भाजपाने आश्वासन पाळले नाही म्हणून आम्ही परतलो

उल्हासनगरमधील बलाढ्य कलानी परिवार मध्यंतरी अडीच ते तीन वर्षांच्या काळासाठी भाजपात गेला होता. मात्र भाजपचा दबाव असल्यानं आपण जाताना शरद पवार साहेबांची परवानगी घेऊनच गेलो होतो. असा खुलासा आता पप्पू कलानी यांची सून माजी महापौर पंचम कलानी यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे. एकेकाळचा डॉन आणि उल्हासनगरचे …

Read More »

ठाकरे गटाचे खासदार राऊत यांचा पलटवार,… एकनाथ शिंदेंना स्मृतीभ्रंश झाला एकनाथ शिंदे यांना ठाकरे नावाची कावीळ झालीय

शिवसेना ठाकरे गटाचे  खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडताना म्हणाले, मिंधे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे या नावाची कावीळ झाली आहे. मोदीभक्त झालेल्या शिंदे गटाला आता उद्धव ठाकरेंवर आणि आमच्या पक्षावर टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही. आरएसएसकडून स्क्रिप्ट लिहून दिली जाते, ते वाचण्याचं काम केलं …

Read More »

न्या. रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ; सर्वाधिक कमी कालावधी मिळणार अवघे चार दिवस मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश

उच्च न्यायालयातील न्यायाधीश रमेश देवकीनंदन धानुका यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. आज राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. धानुका यांना पदाची शपथ दिली. आता पर्यंत न्यायालयाच्या इतिहासात सर्वाधिक कमी कालावधी न्यायमुर्ती धानुका यांना मिळाला आहे. चार दिवसानंतर धानुका हे …

Read More »

वंचितच्या मुंबई अध्यक्षावर आंबेडकर भवन परिसरात प्राणघातक हल्ला जखमी परमेश्वर रणशुर यास केईएम रूग्णालयात केले दाखल

२७ मे रोजी आंबेडकर भवन दादर येथे वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश च्या कार्यकर्त्यांची बैठक होती. मुंबईत सध्या वंचित बहुजन आघाडीच्या जोरदार सभा होत आहेत. पुढील सभा ही ३ जून रोजी होणार आहे त्याची तयारी करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. सायंकाळी ठिक ६.३० ते ७ च्या दरम्यान वंचित चे मुंबई युवा …

Read More »