Breaking News

पप्पू कलानी यांची सून पंचम कलानी म्हणाल्या, शरद पवारांना सांगूनच….. भाजपाने आश्वासन पाळले नाही म्हणून आम्ही परतलो

उल्हासनगरमधील बलाढ्य कलानी परिवार मध्यंतरी अडीच ते तीन वर्षांच्या काळासाठी भाजपात गेला होता. मात्र भाजपचा दबाव असल्यानं आपण जाताना शरद पवार साहेबांची परवानगी घेऊनच गेलो होतो. असा खुलासा आता पप्पू कलानी यांची सून माजी महापौर पंचम कलानी यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे. एकेकाळचा डॉन आणि उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी सुरुवातीपासून शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. पप्पू कलानी यांना एका हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी याने भाजपासोबत जवळीक साधली होती.

टीम ओमी कलानी नावाने संघटना स्थापन करत त्याचे सर्व उमेदवार भाजपच्या चिन्हावर कलानी यांनी उभे केले होते. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार येताच पप्पू कलानी यांची जेलमधून सुटका झाली. भाजपापासून फारकत घेऊन पुन्हा एकदा कलानी परिवार राष्ट्रवादीत आला. यानंतर नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पप्पू कलानी यांची सून माजी महापौर पंचम ओमी कलानी यांनी एक वक्तव्य केलं.

आपण भाजपात जाताना शरद पवार साहेबांची परवानगी घेऊनच गेलो होतो. असा खुलासा पंचम कलानी यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे उल्हासनगर शहरात चर्चांना मोठं उधाण आलं आहे. याबाबत त्यांना विचारलं असता तेव्हाची परिस्थितीच तशी होती की, आपण शरद पवार साहेबांच्या परवानगीने भाजपात गेलो होतो. कारण त्यावेळी काही मोठ्या कौटुंबीक अडचणी होत्या, असं पंचम कलानी म्हणाल्या.

भाजपाने कलानी परिवाराला घेताना पप्पू कलानी यांना जेलमधून बाहेर काढण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र ते आश्वासन भाजपाने पाळलं नाही. म्हणूनच कलानी परिवार पुन्हा एकदा राष्ट्रवादीत आला. अशीही चर्चा यानंतर उल्हासनगरमध्ये सुरू आहे.

Check Also

संध्या सव्वालाखे यांचा आरोप, महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून गैरवापर

महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *