Breaking News

मुंबई

नवीन संकल्पना अंमलात आणून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

यावर्षी साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव हा नवीन संकल्पना अंमलात आणून साजरा करावयाचा आहे. लोकमान्य टिळक यांनी जो हेतू समोर ठेवून गणेशोत्सव सुरू केला, त्या हेतूची जनजागृती करणारा गणेशोत्सव असावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई गणेशोत्सव पूर्व तयारी बाबत बैठकीचे आयोजन करण्यात …

Read More »

नाना पटोले यांची थेट पोलिस महासंचालकाकडे मागणी, ती पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करा… पोलीस भरती प्रक्रियेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करा

पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राज्यातील हजारो मुला-मुलींसाठी मुंबईतील ७ मे २०२३ रोजीची पोलीस भरती परिक्षा ही एक मोठी संधी होती. परंतु या पोलीस भरतीमध्ये अनुचित प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. या परिक्षेत मोठ्या प्रमाणात हायटेक कॉपी करण्यात आली. कमी मार्क असलेल्या मुलांना पात्र ठरवण्यात आले, यासह भरतीसाठी मुलांकडून …

Read More »

१२ वीचा निकाल जाहिरः कोकणचा सर्वाधिक तर मुंबईचा सर्वात कमी टक्क्याचा बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले अभिनंदन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. राज्यात एकूण ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी …

Read More »

१२ वीचा निकाल जाहिरः ९० टक्क्याहून अधिक गुण मिळविणारे घटले मुलांपेक्षा मुलींची उत्तीर्ण होण्याची संख्या जास्त

सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते. विद्यार्थी, पालकांना दुपारी दोन वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल. निकालातील महत्त्वाची बाब म्हणजे, एकूण निकाल घटण्याबरोबरच यंदा ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेले गुणवंत घटले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या १२ वीच्या परीक्षेचा …

Read More »

अजित पवार यांचे कोकणवासियांसाठी थेट केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र, …त्याची चौकशी करा तीन महिने आरक्षण कसे फुल्ल?

बाप्पाच्या श्रद्धेपोटी मुंबईसह आजूबाजूच्या शहरांत स्थायिक असलेले कोकणवासिय गणेशोत्सवात मोठ्या संख्येने गावी जात असतात. त्यासाठी तीन महिने आधीच रेल्वे बुकींग केली जाते. कोकण प्रवाशांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त गाड्याही सोडल्या जातात. परंतु, यावेळेस गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची तिकिटे अवघ्या मिनिटभरात फुल्ल झाल्याने अनेक कोकणवासियांचा हिरमोड झाला. त्यानंतर तिकिट विक्री …

Read More »

नाना पटोले यांची टीका, भाजपाकडून लोकशाही व संविधानाला धाब्यावर…. कर्नाटकच्या विजयात अल्पसंख्याक समाजाचेही मोठे योगदान: अशोक चव्हाण

भारतात गंगा जमुना संस्कृती गुण्या गोविंदाने नांदत होती. हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात ही भारताची जगात ओळख आहे. भारताची ही खरी ओळखच पुसून टाकण्याचे काम मागील ९ वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

युपीएससी निकालात मुलींचा डंका, तर राज्यात ठाण्याची कश्मिरा संख्ये सर्वप्रथम उत्तीर्ण होण्यात मुलींची संख्या जास्त

केंद्रीय लोकसेवा आयोगाने अर्थात यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. त्यात इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक मिळवला असून, अंतिम निकालात राज्यातील उमेदवारही यशवंत ठरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या दहा क्रमांकामध्ये सहा मुली तर चार मुले आहेत. परीक्षेचा निकाल http//www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भारतीय …

Read More »

मंत्री दीपक केसरकर यांचा निर्णयः हे तीन दिवस शाळेचा गणवेश तर बाकीचे दिवस सरकारचे एक राज्य एक गणवेश संकल्पना

राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश योजना अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. यावर्षीपासून राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेतले विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील. सर्व सरकारी शाळांसाठी आता एकच गणवेश लागू होईल अशी जाहिर घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. मात्र सरकारच्या निर्णयापूर्वीच कपड्यांच्या ऑर्डर काही शाळांनी दिल्या आहेत. त्यामुळे …

Read More »

पुणे जिल्ह्यातील हयात विधवा महिलेला मयत दाखवून आर्थिक फसवणूक एसआयटी चौकशी करून महिलेला न्याय द्या - दलित पँथरची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुलाच्या मृत्यूनंतर वारस म्हणून असलेल्या संबंधित मुलाच्या हयात असलेल्या आईला मयत दाखवून तिच्या नावावर असणाऱ्या हक्काच्या पैशांची लुबाडणूक करण्यात आल्याची बाब दलित पँथर या संघटनेने मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांच्या निदर्शनात आणून दिली आहे या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व संबंधितांची एस आयटीमार्फत चौकशी करून त्या विधवा आणि वृद्ध महिलेला …

Read More »

समीर वानखेडे यांना पुन्हा न्यायालयाचा दिलासा, मात्र ‘या’ अटींवर पुढील सुनावणी ८ जूनला होणार

कार्डीलिया क्रुजवरील कारवाई दरम्यान सिने अभिनेता शाहरूख खान याच्या मुलगा आर्यन खान याच्यावर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कारवाई केली. मात्र या आर्यन खान याला बाहेर सोडण्यासाठी शाहरूख खानकडे मोठ्या रकमेची मागणी केल्याप्रकरणाची ठपका एनसीबीने वानखेडे यांच्यावर ठेवला. त्यानंतर भ्रष्टाचारप्रकरणी ‘एनसीबी’चे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल …

Read More »