Breaking News

मुंबई

छगन भुजबळ यांचा पलटवार, मुंबईचा महापौर झाल्याच्या दोन महिन्यांनी रोहित पवार यांचा जन्म मुंबईचा महापौर झाल्याच्या दोन महिन्यांनी रोहित पवार यांचा जन्म

आमदार रोहित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. भुजबळ रोहित पवारांना म्हणाले, माझ्यावर टीका करण्यापूर्वी थोडा इतिहास समजून घ्या, तुम्हाला इतिहास ठाऊक नाही. छगन भुजबळ प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना म्हणाले, त्या रोहित पवारला सांगा, मी जानेवारी-फेब्रुवारी १९८५ मध्ये पहिल्यांदा आमदार झालो. एप्रिल १९८५ ला मुंबईचा मुंबईचा महापौर झालो. त्यानंतर चार महिन्यांनी तुमचा …

Read More »

१९८१ पासून सोबत राहिलेले दिलीप वळसे-पाटील काय म्हणाले शरद पवार यांच्याबद्दल ? वाचा आंबेगाव- शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात मांडली भूमिका

मध्यल्या काळात राजकीय घडामोडी झाल्या त्यामधून राज्यामध्ये नवीन समीकरणं तयार झाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मंत्रिमंडळात सहभागी झाला. मी सुद्धा मंत्रिमंडळात सहभागी झालो. आपण जरी हा निर्णय घेतला असला तरी आपण काही कोणी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला नाही. आपली राष्ट्रवादी ही वेगळी राहणार आहे. त्याआधारे आपल्याला भविष्यात …

Read More »

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी २५ लाख देणार 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात साधला 'महिला व ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवाद'

ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेले दिसून येतात. मुंबईतील हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून प्रायोगिक तत्वावर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी २५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात विरंगुळा …

Read More »

शिवसेनाः दोन्ही गटातील ५४ आमदारांना विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसा लेखी म्हणणे सादर करण्यास सात दिवसांची मुदत

शिवसेना नेमकी कोणाची आणि राज्यातील सत्तासंघर्षाच्यादृष्टीने महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देऊनही जवळपास दोन महिन्याहून अधिक काळ लोटला गेला. विशेष म्हणजे त्यास येत्या ११ जुलै रोजी ९० दिवस पूर्ण होत आहेत. यापार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांच्या पात्र-अपात्रेबाबतच्या कारवाईस सुरुवात केली आहे. …

Read More »

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले हे निर्देश शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको

नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले. आज सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास ठाकरे यांनी वर्षा …

Read More »

परिवहन विभागाच्या सेवांसाठी आधारबेस फेसलेस सुविधा घरबसल्या मिळवा परिवहन सेवांचा लाभ

परिवहन विभागाच्या सेवा आता कार्यालयात न जाता फेसलेस सुविधेचा उपयोग करून मिळविता येणार आहे. फेसलेस सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयाची पायरी चढण्याची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीने फेसलेस सेवेमार्फत अर्ज केल्यास, आहे त्या ठिकाणाहून किंवा घरबसल्या कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज सादर करून या सुविधेचा लाभ घेता येणार …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, पात्र गिरणी कामगारांसाठी घरकुलांची निर्मिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित

गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करून पात्र कामगारांना घरे देण्यासाठी शासनामार्फत जे निर्णय घेणे आवश्यक असेल ते घेतले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विविध योजनांमधून घरे उपलब्ध होत असून सर्व पात्र गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी अधिकच्या घरकुलांची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण …

Read More »

राष्ट्रपती म्हणाल्या, आदिवासी क्रांतिकारकांवर अधिक संशोधन करण्याची गरज राज्यपाल भवनाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याकडून राष्ट्रपतींना माहिती

मुंबई भेटीवर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांच्यासह राजभवनातील भूमिगत बंकरमध्ये तयार केलेल्या ‘क्रांती गाथा’ या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली. यावेळी राष्ट्रपतींनी बंकरमध्ये ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. राष्ट्रपतींनी प्रथम राज्यातील तसेच देशातील आदिवासी क्रांतिकारकांच्या दालनाला भेट देऊन आदिवासी क्रांतिकारकांबाबत …

Read More »

पंकजा मुंडे म्हणाल्या, पक्षानं आधी फॉर्म भरायला लावला अन…नंतर सांगितलं गरज नाही मी भाजपामध्येच राहणार पण पक्षानंही माझ्या चर्चेवर बोलावं

नुकतेच बीड जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या निवडणूकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा-बहिणीत समझौता झाल्याची चर्चा ऐकायला मिळाली. नेमक्या त्याच कालावधीत बीआरएस, एमआयएम आणि महादेव जानकर यांनीही रासपची ऑफर दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या नाट्यानंतर राज्य मंत्रिमंडळात पुन्हा एकदा मंत्री झालेले धनंजय मुंडे हे मंत्री झाल्यानंतर पुन्हा बहिणीच्या घरी …

Read More »

मुंबई सहनिबंधक कार्यालयातील या पदांसाठी उद्यापासून अर्ज भरा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ७ जुलै पासून सुरू होणार

मुंबई विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) या कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सहकार अधिकारी श्रेणी-१, सहकार अधिकारी श्रेणी-२, सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपीक या संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. या स्पर्धा परिक्षेकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज ७ जुलै २०२३ पासून करता येणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबतच्या सविस्तर तपशिलासह …

Read More »