Breaking News

मुंबई

झोपडपट्टी पुनर्वसन योजना मंजुरी देण्यासाठी समिती गठित गृहनिर्माण विभागाचा निर्णय

रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यासाठी नामिका सूचीतील विकासकांमार्फत प्राप्त निविदांची छाननी करुन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सादर केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेणे, तसेच अभय योजनेअंतर्गत वित्तीय संस्था/ त्यांनी प्राधिकृत केलेल्या सक्षम संस्थेस ही योजना पूर्ण करण्यास मंजुरी देण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी अपर मुख्य सचिव (गृहनिर्माण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली …

Read More »

प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान उस्ताद झाकीर हुसेन यांना त्यांच्या निवासस्थानी सन्मानपूर्वक दिला

केंद्र सरकारच्या वतीने सन २०२३ साठी जाहीर झालेला पद्मविभूषण पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना आज त्यांच्या निवासस्थानी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. ‘माझ्या कलेच्या माध्यमातून केलेल्या सेवेची दाखल घेतली, मी कृतज्ञ आहे ‘ अशी भावना यावेळी उस्ताद झाकीर हुसेन यांनी व्यक्त केली. मानपत्र आणि पदक असे या पुरस्काराचे …

Read More »

सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला एसटी तर्फे दहा लाख जखमींवर शासकीय खर्चाने उपचार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिकमधील कळवण येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे घटनास्थळी दाखल झाले आहेत. खामगाव आगाराची बस सप्तशृंगी …

Read More »

आयडॉलच्या एमएमएस व एमसीए प्रवेश परीक्षांचे अर्ज १२ जुलै २०२३ पासून ऑनलाईन सुरु दूरस्थ पध्दतीने घेता येणार शिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन अर्थात आयडॉल संस्थेला २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांसाठी एआयसीटीई व यूजीसीने एमएमएस व एमसीए हे दोन अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु करण्यास परवानगी दिली असून या अभ्यासक्रमाचे प्रवेश परीक्षांचे अर्ज ऑनलाईन माध्यमातून आजपासून ( बुधवार, दिनांक १२ जुलै २०२३ ) सुरु होत असून शेवटची तारीख …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची सूचना, पोलिसांनी तपास कामांत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरावे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची अर्ध वार्षिक परिषद

जगात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल इंटीलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही तपास कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पोलीस मुख्यालयात राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय अर्ध वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र; कमरेचा, गळ्याचा पट्टा….हे लोक म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लोकांच्या दारी जाण्यापेक्षा घरी जा

‘भाजपावाले आणि मिंधे माझ्या ऑपरेशनवरून चेष्टा करतात. कमरेचा, गळ्याचा पट्टा सुटला म्हणतात. इतक्या खालच्या पातळीवर जाता. मी जे भोगलंय ते त्यांना भोगावं लागू नये ही माझी प्रार्थना आहे. कोणाच्या तब्येतीवरून, कोणाच्या कुटुंबावर बोलता. यामुळे माझे म्हणणं आहे की हे लोक म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेला कलंकच असल्याचा पुर्नरूच्चार करत शिवसेना (ठाकरे …

Read More »

‘शासन आपल्या दारी’चा पुणे जिल्ह्यात पहिलाच कार्यक्रमाच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन कार्यक्रमाच्या अनुषंगाने १३ जुलै रोजी वाहतुकीत बदल

पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी …

Read More »

राहुल नार्वेकर म्हणाले, सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर नवे विधान भवन उभारणार प्रस्ताव दाखव झाल्यानंतर त्याबाबत सविस्तर माहिती देतो

केंद्रातील मोदी सरकारने भविष्यकालीन सदस्य संख्या वाढीच्या दृष्टीकोनातून सेंट्रल विस्टा या नावाने नव्या संसद भवनाची इमारत उभारली. त्याधर्तीवर महाराष्ट्रातील विधान भवनाची नवी इमारत उभी करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देत सध्या त्या बाबतची कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. परंतु लवकरच प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचेही सांगितले. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, ज्येष्ठ नागरिक, महिला, बालकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा अर्धवार्षिक गुन्हे परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आदेश

ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस प्रशासनाला दिले. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय अर्ध वार्षिक गुन्हे परिषदेचे आयोजन मुंबईतील पोलीस मुख्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

उद्धव ठाकरे यांच्या सततच्या आरोपावर भाजपाचे बावनकुळे म्हणाले, हिंमत असेल तर एकदा… हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुत आहात तर सांगाच तुमचे सुत कोणाशी जुळले

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून यवतमाळ मधील दिग्रस येथे काल भाषण करताना पोहरादेवीची शपथ घेत सांगितलं होतं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदाबाबत अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता. त्यांनी जगदंबेची शपथ घेऊनही हीच गोष्ट सांगितली. पण …

Read More »