Breaking News

राहुल नार्वेकर म्हणाले, सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर नवे विधान भवन उभारणार प्रस्ताव दाखव झाल्यानंतर त्याबाबत सविस्तर माहिती देतो

केंद्रातील मोदी सरकारने भविष्यकालीन सदस्य संख्या वाढीच्या दृष्टीकोनातून सेंट्रल विस्टा या नावाने नव्या संसद भवनाची इमारत उभारली. त्याधर्तीवर महाराष्ट्रातील विधान भवनाची नवी इमारत उभी करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देत सध्या त्या बाबतची कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. परंतु लवकरच प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

अभ्यास करूनच निर्णय घेणार
दरम्यान आपण या प्रकरणाचा अभ्यास करून क्रांतिकारी निर्णय घेऊ असे विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी म्हटले होते. आपण कोणाच्या दबावाला झुकणार नाही. अभ्यास करूनच निर्णय घेणार, असे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले होते. आताही आपणावर निर्णयासाठी कोणी दबाव आणू शकत नाही. आपला निर्णय न पटल्यास न्यायालयात दाद मागू शकतात, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.

नरहरी झिरवळ यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड

अजित पवार यांच्या गटाबरोबरच सत्ताधारी पक्षात दाखल झालेले विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरतील, असे वक्तव्य केल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त करत “आमच्या पैकी कुणीही अपात्र होणार नाही. त्यामुळे झिरवळ यांनी सांभाळून बोलले पाहिजे, तुम्हाला जो अधिकार नाही,” असे शिरसाट यांनी झिरवळ यांना सुनावले आहे.

शिवसेनेत दुभंग होऊन शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते. मात्र महाविकास आघाडी अल्पमतात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांना राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर घटनात्मक तांत्रिक बाबींचा उहापोह होऊ लागला. व्हिप कोणाचा लागू होतो, हा वाद न्यायायालयात गेला. ठाकरे गटाचा व्हिप मोडल्याने शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र करण्याती याचिका ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. तर शिंदे गटाचा व्हिप मोडल्याने ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्र ठरवावे अशी याचिका शिंदे गटाकडून दाखल करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचेभरत गोगावले याचे प्रतोदपद रद्द केले आहे. त्यामुळे गोगावले यांचे व्हिप लागू होणार नाहीत. सुनील प्रभू यांचे व्हिप लागू होणार आहेत. प्रभू यांच्या व्हिपचे शिंदे गटाच्या आमदारांनी उल्लंघन केले आहे. त्यामुळे अॅडव्होकेट असलेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एक तर प्रभू यांच्या व्हिपनुसारच निर्णय द्यावा लागणार आहे किंवा संविधान आणि कायद्याचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. प्रभू यांच्या ह्विपनुसार निर्णय घेतल्यास शिंदे गटाला धोका संभवण्याची चिन्हे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपविले असून त्यांना ९० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ११ मे २०२३ रोजी आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपविले आहे. त्यावेळीही प्रकरण माझ्याकडे आले तर मी योग्य तो निर्णय घेईन, असे निरहरी झिरवळ यांनी म्हटले होते. मात्र मध्यंतरी घडलेल्या घडोमडीत रविवारी २ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्ताधारी गटात सहभागी झाला. त्या गटामध्ये नरहरी झिरवळ यांचा समावेश आहे. आता विधानसभा अध्यक्ष अॅक्नश मोडमध्ये आहेत. आणि त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. शिंदे गटासह ठाकरे गटातील आमदारांना अपात्र प्रकरणात कारवाई सुरु झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांना नोटीस पाठवत पुढील सात दिवसात म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावर बोलताना अजित पवार गटातील आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरतील, असे वक्तव्य केल्याने वाद सुरु झाला आहे.

Check Also

भारतीय निवडणूक प्रक्रियेचे चार देशांच्या परदेशी शिष्टमंडळाकडून कौतुक

भारतासारख्या लोकशाही देशात निवडणूक प्रक्रिया ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. येथील मतदारांचा स्वयंप्रेरीत मतदानासाठीचा उत्साह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *