Breaking News

राष्ट्रवादीच्यावतीने आता ‘जॉब दो’ आंदोलन

कार्यकर्त्यांनी मोदी सरकारकडे जॉब मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन  

मुंबई: प्रतिनिधी

जॉब दो… जॉब दो मोदी सरकार जवाब दो… राष्ट्रवादीची एकच पुकार जॉब दो… ये आझादी झुठी है… ये सरकार बदलनी है…मोदी सरकार हाय हाय…युवाओ को जो काम न दे वो सरकार बदलनी है… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो…अशा गगनभेदी घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज बँलार्ड पिअर आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला.

आज मुंबईमध्ये ‘जॉब दो मोदी सरकार जवाब दो’ म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात ‘जॉब दो… मोदी सरकार जवाब दो’ असे आंदोलन करण्यात आले. आंदोलन करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी लगेच ताब्यात घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली मात्र घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असतानाच पोलिसांनी सर्वांना अटक केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार राज्यभर भाजप सरकारच्याविरोधात आंदोलन पुकारले जात असून मोदींच्या खोट्या आश्वासनावर आंदोलनात भर देण्यात आला आहे.

यावेळी आंदोलनामध्ये मुंबई महानगरातील पक्षाचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो,युवक अध्यक्ष अॅड निलेश भोसले, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मानम, उत्तर मुंबई कार्याध्यक्षा फेहमिदा खान,दक्षिण मुंबई युवक अध्यक्ष सचिन नारकर,मुंबई युवक उपाध्यक्ष अमित हिंदळेकर, कुलाबा तालुकाध्यक्ष मनोज आंब्रे,  मुंबई महिला सरचिटणीस स्वाती माने आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.

Check Also

चला.. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊ या, मतदानासाठी या आहेत सुविधा ….

लोकसभा निवडणूक २०२४ साठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *