कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्येप्रकरणी रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपन्यांची सुध्दा चौकशी केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
आमदार अँड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून नितीन देसाई यांच्या मृत्यूची अपघाती मृत्यू एवढीच चौकशी न करता ही चौकशी अधिक व्यापक करण्याची मागणी त्यांनी केली.
याबाबत आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, आपल्या कर्तृत्त्वाने, प्रतिभेने कलादिग्दर्शन क्षेत्रात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे, चार राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे नितिन चंद्रकांत देसाई यांनी दुर्दैवीरीत्या आपले जीवन संपवले. त्यांनी एनडी स्टुडिओवर १८० कोटींचे कर्ज काढले होते. या १८० कोटींचे २५२ कोटी झाले. या प्रकरणातून रशेष शाह नामक व्यक्ती आणि ‘एआरसी एडेलव्हाईस’ कंपनीच्या सावकारी पद्धतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे केवळ अपघाती मृत्यू म्हणून या प्रकरणाची चौकशी न करता या कंपनीच्या व्याजाचा दर, व्याज वृद्धीचा दर, वसूलीची पद्धत या सर्व कार्यपद्धतीची विशेष टीम नेमून चौकशी करावी आणि दिवंगत नितीन चंद्रकांत देसाई यांना न्याय द्यावा, अशी मागणी सभागृहात केली. या कंपन्या आधुनिक सावकार असून त्यांची अन्य दोन प्रकरणाची माहिती आपल्याकडे असून तीही गृहमंत्र्यांकडे देणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, त्यावर उत्तर देताना गृहमंत्र्यांनी अशी चौकशी करण्याचे मान्य केले.
Statement on the unfortunate incident of the very creative and talented Nitin Chandrakant Desai in the Maharashtra Legislative Assembly today.
नितीन देसाई हे खऱ्या अर्थाने मराठी माणसाला अभिमान वाटावे, असे व्यक्तिमत्व होते. अनेक राजकीय पक्षांना सुद्धा मोठ्या आयोजनात ते मदत करायचे.… pic.twitter.com/tFYJQ0VIxV— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 3, 2023
नितीन देसाई यांचा एन.डी. स्टुडिओ राज्य सरकारने अधिग्रहित करावा!: अशोक चव्हाण
दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एन.डी. स्टुडिओचा लिलाव न होऊ देता राज्य सरकारने तो अधिग्रहित करावा; ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
देसाई यांच्या आत्महत्येसंदर्भात बोलताना त्यांनी आज विधानसभेत ही मागणी केली. याविषयी ते म्हणाले की, नितीन देसाई यांनी आपल्या कर्तृत्वातून, परिश्रमातून, तपस्येने चित्रसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले. सर्वांच्याच मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी काही ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड करून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये त्यांच्यावरील कर्ज आणि त्या कर्जाच्या वसुलीसाठी जाचक पद्धतीने काही लोक त्यांच्या मागे लागल्याचा उल्लेख असल्याचे ऐकिवात आहे. याबाबतची सत्यता गृहमंत्र्यांनी स्पष्ट करावी.
अशोक चव्हाण यांच्या मागणीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन देसाई यांच्या आत्महत्येची सर्व बाजुंनी सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. एन.डी. स्टुडिओवर कर्ज असल्याने तो अधिग्रहित करण्याबाबत कायदेशीर पैलू तपासले जातील, असेही गृहमंत्री म्हणाले.
दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एन.डी. स्टुडिओचा लिलाव न होऊ देता राज्य सरकारने तो अधिग्रहित करावा; ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी मागणी मी आज विधानसभेत केली. नितीन देसाई यांनी आपल्या कर्तृत्वातून, परिश्रमातून, तपस्येने चित्रसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले.… pic.twitter.com/b3jSO8UiN3
— Ashok Chavan (@AshokChavanINC) August 3, 2023