Breaking News

आदित्य ठाकरे यांचा सवाल,… खरंच गुड गव्हर्नन्स तरी आहे का?

देशाचे माजी पंतप्रधान तथा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचा आज जन्मदिवस. परंतु या दिवसाचे औचित्य साधत केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस हा गुड गव्हर्नन्स दिवस म्हणून जाहीर करण्यात आला. मात्र याच दिवसाचे औचित्य साधत शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपा आणि राज्य सरकारला एक्सवर ट्विट करत खोचक सवाल करत टीका केली.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर ट्विट करत म्हणाले की, आजचा दिवस हा गुड गव्हर्नन्स म्हणून ओळखला जातो. पण खरचं महाराष्ट्रात गुड गव्हर्नन्स आहे का असा थेट सवाल करत महाराष्ट्राला पुन्हा फसवलं असा आरोपही केला.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांच्या दिनाचे औचित्य साधत आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या उद्घाटनाची तारीख असेल असं प्रसार माध्यमात सांगितलं होते. पण आता ते उद्घाटन पुन्हा पुढच्या वर्षावर ढकललं असल्याची टीकाही राज्य सरकारवर केली.

तसेच आदित्य ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक तयार होऊन ३ महिने झाले. दिघा रेल्वे स्टेशन ८ महिन्यापूर्वी तयार झालेलं असूनही त्याचं अद्याप उद्घाटन झालं नाही. कोणासाठी नेमकं थांबवल हे सगळ ? असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केला.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतचं उद्घाटन केलेले सूरतचं डायमंड बोर्ज मात्र लगेच जगाला दाखवलं.
वेदांता फॉक्सकॉन, एयरबस टाटा, डायमंड बोर्ज, मेडिकल डिव्हाईस पार्क, ४० गद्दार… सगळं तिथे नेलं…. अशी खोचक टीका करत तसेच हा आपल्या महाराष्ट्राचा अपमान किती दिवस सहन करायचा? असा सवाल करत २०२४ मध्ये तुम्ही ठरवा, आपल्या राज्याचं भविष्य आपण ठरवायचं की शेजारच्या राज्याने आणि गद्दार म्हणून ओळख असलेल्या त्यांच्या चेल्यांनी! असे आवाहनही केले.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *