Breaking News

टीआयएटी आणि एएमआयएन एव्हिएशनचे ’विमान सुरक्षा उपकरण प्रदर्शन’ प्रदर्शनात ड्रोनची प्रात्यक्षिके दाखविली

मुंबई : प्रतिनिधी
ठाकूर इंस्टिट्युट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी येथे एईएसआयच्या (एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया) मुंबई शाखेद्वारे आणि टीआयएटी आणि एएमआयएन एव्हिएशनद्वारे विमान सुरक्षा उपकरणाच्या डेमोचे आयोजन करण्यात आले होते. विमान सुरक्षा उपकरण प्रदर्शन’ सह सेमीनारचे उद्घाटन टीआयएटीचे वरिष्ठ प्रशिक्षक आणि एईएसआयच्या मुंबई शाखेचे मा. संयुक्त सचिव विवेक कुलकर्णी यांनी केले तसेच मॅक्स एरोस्पेस ग्रूपचे अध्यक्ष आणि एमडी भरत मल्कानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ठाकूर इंस्टिट्युट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी (टीआयएटी) च्या २५ विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले. यांमधून पाच जणांना या कार्यक्रमात त्यांचे प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी निवडले गेले. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई), एअरक्राफ्ट बर्ड स्ट्राईक, लॅंडिंग एड्स, कम्पोजिट सेफटी, एअरक्राफ्ट साईड राफ्टर मेगाफोन, सीट बेल्ट, लाईव्ह जॅकेट आणि द्रोन हे उपकरण या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आले.
टीआयएटीचे विद्यार्थी ललित नागपूरकर आणि प्रतीक यांनी कॅमेर्‍याला जोडलेले ड्रोन आणि अग्निशामक यंत्र बनवल्यामुळे त्यांना प्रथक पारितोषिक देण्यात आले. दोन्ही विद्यार्थ्यांनी तेथे ड्रोन चालवून दाखवले. दोन कॅमेरामधील पूरक सामग्री त्याला जोडलेल्या मोबाईलमध्ये पाहता येऊ शकते. कॅमेर्‍याला जोडलेले ड्रोन आणि अग्निशामक यंत्र या संकल्पनेचे भरपूर कौतुक जमलेल्या प्रेक्षकांनी केले.
त्यानंतर एअरपोर्ट ऑथोरीटी ऑफ इंडियाचे क्षेत्रीय कार्यकारी संचालक, डब्ल्यूआर केशव शर्मा यांनी सेमिनारमध्ये स्वागत भाषण सादर केले आणि टीआयएटीद्वारे आयोजित करण्यात येणार्‍या ड्रोन कार्यशाळेमध्ये त्यांनी आपली रुची दर्शवली. जवळच्या शाळा, एएमई इंस्टिट्युट, आयआयटी मुंबई, वैमानिक विभागाचे कर्मचारी आणि इतर अनेकांनी सेमिनारमध्ये उपस्थिती दर्शवली.

Check Also

मुंबई उच्च न्यायालयाचे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या औरंगाबाद शहर आणि महसूल क्षेत्राचे अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *