Breaking News

कोरोना : अबब मुंबईत ८ हजारापार तर राज्यात पाच पटीहून अधिक ४३ हजार १८३ नवे बाधित, ३२ हजार ६४१ बरे झाले तर २४९ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील बाधितांची संख्या ५ ते ७ हजाराच्या दरम्यान नोंदविली जात होती. परंतु आज शहरातील बाधितांच्या संख्येने उच्चांकी पातळी गाठत थेट ८ हजाराच्या पार गेली असून ८ हजार ६४८ कोरोना रूग्ण आढळून आले. एकट्या मुंबईत इतक्या मोठ्या प्रमाणावर संख्या आढळून येण्याचे प्रमाण हे काळजी करायला लावणार आहे. तर राज्यात ४३ हजार १८३ बाधित आढळून आल्याने राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ५३३ इतकी नोंदविली आहे.

राज्यातील सर्वाधिक बाधित मुंबईनंतर पुणे शहर व ग्रामीण भागात ५९६७ रूग्ण, पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार ५८, नाशिक मध्ये ३ हजाराहून अधिक, नागपूरात ३ हजार ६०० हून अधिक, ठाणे शहर व ग्रामीणमध्ये २ हजारहून अधिक, नवी मुंबईत १ हजाराहून अधिक, कल्याण-डोंबिवलीत ९६४ इतके बाधित आढळून आले आहेत. राज्याच्या इतर भागात जरी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर रूग्ण संख्या वाढत असली तरी कोल्हापूर मंडळातील कोल्हापूर शहर व ग्रामीण, सांगली, सांगली-मिरज कुपवाड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव होत नसल्याचे सातत्याने दिसून येत आहे.

मागील २४ तासात ३२ हजार ६४१ रुग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या २४ लाख ३३ हजार ३६८ वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.२% एवढे असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात आज २४९  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.९२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९९ लाख ७५ हजार ३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २८ लाख ५६ हजार १६३ (१४.३० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,०९,४९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १८,४३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८,६४६ ४,२३,४१९ १८ ११,७०८
ठाणे ६१६ ५१,८५३ १,०२०
ठाणे मनपा १,४६५ ८०,५१० १,२५७
नवी मुंबई मनपा १,०६० ७२,१८३ १,१९२
कल्याण डोंबवली मनपा ९६४ ८४,७७७ १,११५
उल्हासनगर मनपा २१४ १४,१७१ ३६७
भिवंडी निजामपूर मनपा ५३ ७,९२० ३४४
मीरा भाईंदर मनपा ४२३ ३२,९७१ ६८५
पालघर २१७ १९,३१४ ३२१
१० वसईविरार मनपा ३६१ ३५,३३६ ६५४
११ रायगड ३५९ ४२,०१४ १,०१९
१२ पनवेल मनपा ४०८ ३९,३९३ ६३९
ठाणे मंडळ एकूण १४,७८६ ९,०३,८६१ ३४ २०,३२१
१३ नाशिक १,२५८ ५६,२४९ ८८८
१४ नाशिक मनपा १,७८१ १,१८,७९० १३ १,१७२
१५ मालेगाव मनपा ५९ ७,०५६ १८१
१६ अहमदनगर ८९१ ६२,१०० ७८७
१७ अहमदनगर मनपा ३८८ ३३,२२३ ४३४
१८ धुळे २८३ १३,९६८ १९८
१९ धुळे मनपा १६० १२,५०६ १६७
२० जळगाव ५६५ ६३,७२४ १,२३७
२१ जळगाव मनपा ५०० २२,७८४ ३६२
२२ नंदूरबार ४६६ १८,४९८ १० ३०१
नाशिक मंडळ एकूण ६,३५१ ४,०८,८९८ ४१ ५,७२७
२३ पुणे १,७६७ १,२५,१३७ १० २,२३१
२४ पुणे मनपा ४,२०० २,८१,४१८ ४,७३४
२५ पिंपरी चिंचवड मनपा २,०५८ १,३७,७३२ १,३७८
२६ सोलापूर ३७० ४९,८१२ १,२६६
२७ सोलापूर मनपा ३८६ १७,९७३ ६४८
२८ सातारा ५२८ ६६,०१५ १,८८४
पुणे मंडळ एकूण ९,३०९ ६,७८,०८७ २३ १२,१४१
२९ कोल्हापूर ४८ ३५,७०१ १,२७०
३० कोल्हापूर मनपा ४८ १५,६९६ ४२७
३१ सांगली १९४ ३५,४२६ १,१७७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ७३ १९,३८१ ६४८
३३ सिंधुदुर्ग ५३ ७,३६२ १८७
३४ रत्नागिरी ६९ १३,१८५ ४३०
कोल्हापूर मंडळ एकूण ४८५ १,२६,७५१ ४,१३९
३५ औरंगाबाद ५११ २३,९६३ ३६२
३६ औरंगाबाद मनपा ९४३ ६१,४०८ ३५ १,०१५
३७ जालना ३१६ २३,३२२ ४११
३८ हिंगोली १०३ ७,११० १०३
३९ परभणी २५२ ७,४४० १८९
४० परभणी मनपा १९७ ७,१६१ १६९
औरंगाबाद मंडळ एकूण २,३२२ १,३०,४०४ ४३ २,२४९
४१ लातूर ३८५ २५,९५७ ५००
४२ लातूर मनपा २९३ ७,९४७ २५२
४३ उस्मानाबाद २८७ २१,६८२ ५९१
४४ बीड ३९४ २६,३७९ ६२१
४५ नांदेड ६६० १६,८७७ ४२२
४६ नांदेड मनपा ६६२ २७,६९० ३६५
लातूर मंडळ एकूण २,६८१ १,२६,५३२ ३० २,७५१
४७ अकोला १४३ १०,५४२ १६५
४८ अकोला मनपा ३११ १८,२८० ३०२
४९ अमरावती २०५ १७,३२२ २९४
५० अमरावती मनपा ९५ ३२,०५७ ३५६
५१ यवतमाळ २५९ २८,६८७ ५२८
५२ बुलढाणा ३६५ २८,१३३ २८५
५३ वाशिम २९६ १६,५०७ १८९
अकोला मंडळ एकूण १,६७४ १,५१,५२८ २,११९
५४ नागपूर १,१०९ ३८,९८९ १० ९०६
५५ नागपूर मनपा २,५८७ १,९४,८९४ ५० ३,०१३
५६ वर्धा ३६५ २१,५८० ३७८
५७ भंडारा ७५० १८,६२५ ३२१
५८ गोंदिया १६३ १६,१८९ १८२
५९ चंद्रपूर ४०० १८,४६५ २६९
६० चंद्रपूर मनपा १२६ ११,०७७ १७६
६१ गडचिरोली ७५ १०,१३७ ११०
नागपूर एकूण ५,५७५ ३,२९,९५६ ६४ ५,३५५
इतर राज्ये /देश १४६ ९६
एकूण ४३,१८३ २८,५६,१६३ २४९ ५४,८९८

आज नोंद झालेल्या एकूण २४९ मृत्यूंपैकी १४० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

 

Check Also

म्युकरमायकोसीसवरील उपचारासाठी राज्य सरकारने केले दर निश्चित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *