Breaking News

ऊसतोडणी कामगारांचे हाल थांबवा हो… ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

कोरोना विषाणूच्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने ऊस तोडणी कामगारसाठी सोयीसुविधा पुरविण्याबाबतचा जीआर सरकारने काढला. मात्र यातील तरतूदीनुसार साखर कारखानदारांनी ऊसतोडणी कामगारपर्यत कोणत्याही गोष्टी पोहोचल्या नाहीत. भोजन निवास ना वैदयकिय तपासणी सुरक्षा या कोणत्याच गोष्टी कारखानदारने अद्याप दिलेल्या नाहीत. त्यामुळे स्वत:चे होणारे हाल थाबविण्यासाठी वैतागलेला आणि भयभीत झालेला ऊसतोडणी कामगार हा आपल्या गावी परतत आहे. परंतु पायी जाणाऱ्या कामगारांना पोलिसही जाण्यास परवानगी देत नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून त्यांचे हाल सरकारने तरी थांबवावे अशी मागणी ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे नेते डॉ.डि.एल कराड यांनी केली.

ऊसतोडणी कामगार यांना सध्या ज्या शाळेत आणि कॉलेज मध्ये ठेवले, त्या ठिकाणी ते अन्नपाण्यावाचून हाल होत आहे. तसेच ते एकत्र असलयाने त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका असल्याची भीती व्यक्त करत या परिस्थिला  कंटाळून  ऊसतोडणी कामगार आत्म्हत्या करण्याची भाषा बोलू लागला असल्याची कैफीयत त्यांनी राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली.

ऊसतोडणी कामगार सांगली, कोल्हापूर ,सातारा पुणे, अशा  विविध जिल्ह्यातून आपापल्या गावी परतत आहेत. तसेच महाराष्ट्रच्या विविध जिल्ह्यात तसेच कर्नाटक मध्ये हि  ऊसतोडणी कामगार अडकून पडले आहेत. त्यांचे हि भयंकर हाल होत आहेत. ऊसतोडणी कामगार यांना त्यांच्या गावी घेऊन जाण्याची व्यवस्था सरकारने करावी, तसेच त्यांना एकच शाळेत किंव्हा कॉलेजात न ठेवता विविध ठिकाणी ठेवावे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू यांना  यासंदर्भातील निवेदन दिले असून त्यानुसार या कामगारांना सर्वप्रकारचे संरक्षण देवून या कामगाराना जीवनदान द्यावे अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *