Breaking News

राज्यातील रूग्णवाढीचा दर ११ दिवसांवरून १७ दिवसांवर २४८७ नवीन रुग्ण, ८९ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी
राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.७ दिवस होता. तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १५.७ दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४३.३५ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्केवर आला असून २ हजार ४८७ रूग्णांचे निदान झाले आहे. तर ८९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रूग्णांची संख्या ६७ हजारावर पोहोचली तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३६ हजारावर पोहोचल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज १२४८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २९ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३६ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ६२ हजार १७६ नमुन्यांपैकी ६७ हजार ६५५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४४ शासकीय आणि ३४ खाजगी अशा ७८ प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष ३५८५ एवढे असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे ७० मुंबई -५२, नवी मुंबई -९,ठाणे – ५, कल्याण डोंबवली -४.
नाशिक मालेगाव -६
पुणे ११ पुणे  -९, सोलापूर -२
लातूर उस्मानाबाद -१
अकोला यवतमाळ – १
अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई महानगरपालिका ३९६८६ १६७९१ १२७९ २१६१०
ठाणे ९५८५ ३४०० २०० ५९८५
पालघर १०१८ ३७८ ३० ६१०
रायगड ११०८ ५७३ ३९ ४९४
नाशिक ११३५ ८९३ ६६ १७६
अहमदनगर १२० ५७ ५७
धुळे १४० ८६ १६ ३८
जळगाव ६१६ २७७ ७२ २६७
अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
नंदूरबार ३५ २० १२
१० पुणे ७९१९ ३६९९ ३२९ ३८९१
११ सोलापूर ८९७ ३७१ ७० ४५६
१२ सातारा ५२३ १४८ १६ ३५९
१३ कोल्हापूर ४५७ १५० ३०३
१४ सांगली ११२ ५८ ५३
१५ सिंधुदुर्ग ३३ २५
१६ रत्नागिरी २६४ ९८ १६१
१७ औरंगाबाद १५०१ ९८६ ६५ ४५०
१८ जालना १२५ ५४ ७१
१९ हिंगोली १४९ ९८ ५१
२० परभणी ६३ ५९
२१ लातूर १२५ ६० ६२
२२ उस्मानाबाद ७३ १९ ५३
२३ बीड ४७ १३ ३४
२४ नांदेड १११ ८६ १९
२५ अकोला ५८४ ३१९ २८ २३६
२६ अमरावती २२६ १२४ १६ ८६
२७ यवतमाळ १३० ९९ ३०
२८ बुलढाणा ६२ ३३ २६
२९ वाशिम
३० नागपूर ५७४ ३५८ १० २०६
३१ वर्धा १२ ११
३२ भंडारा ३२ २३
३३ गोंदिया ६६ ३२ ३४
३४ चंद्रपूर २५ १५ १०
३५ गडचिरोली ३५ २७
इतर राज्ये /देश ५९ १५ ४४
एकूण ६७६५५ २९३२९ २२८६ ३६०३१

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *