Breaking News

गॅस सिलिंडरच्या दरात नोव्हेंबरच्या पहिल्यादिवशी ‘इतक्या’ रुपयांची वाढ दिवाळीपूर्वी गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीने खाद्यपदार्थाचे वाढणार दर

व्यवसायिक वापरासाठी वापरण्यात येणारा कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात जबरदस्त वाढ केली आहे. कमर्शियल गॅस सिलिंडर चे दर आता १०१. ०५ रुपयांनी वाढले आहेत. हे नवे दर बुधवारी १ नोव्हेंबर, २०२३ पासून लागू होत आहे. अर्थात, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला असून हॉटेल व्यव्यसायीक आपल्या खाद्यपदार्थाच्या दाराच्या किमतीमध्ये वाढ करू शकतात.

या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत १९ किलोग्रॅम एलपीजी सिलिंडरची किंमत १८३३ रुपये झाली आहे. यापूर्वी १ ऑक्टोबरला देखील कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत २०९ रुपयांची वाढ झाली होती.ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलोग्रॅमच्या कमर्शिअल एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कसल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ९०३ रुपये, कोलकात्यात १४ किलो सिलिंडरची किंमत ९२९ रुपये, मुंबईमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ९०२..५ रुपये, तर चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९१८.५ रुपये एवढी आहे. या दर वाढीनंतर, दिल्लीत कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत १८३३ रुपये झाली आहे. १९ किलोचे गॅस सिलिंडर आता कोलकात्यात १९४३ रुपयांना मिळेल. मुंबईमध्ये कमर्शिअल गॅस सिलिंडरचा दर १७८५.५० रुपये असेल.

Check Also

पतंजली फूड्सने संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला हा निर्णय नॉन फूड्स प्रकल्प खरेदी करण्याचा निर्णय

पतंजली फूड्सने शुक्रवारी सांगितले की त्यांच्या संचालक मंडळाने २६ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या बैठकीत पतंजली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *