Breaking News

आयपीओतून कंपन्यांनी उभारले किती लाख कोटी माहित आहे का? मग वाचा ६३ कंपन्यांनी उभारले १.१८ लाख कोटी

मराठी ई-बातम्या टीम

यंदा आयपीओमधून ६३ कंपन्यांनी १,१८,७०४ कोटी रुपये उभारले आहेत. ही रक्कम २०२० च्या तुलनेत ४.५ पट आहे. २०२० मध्ये १५ आयपीओमधून २६,६१३ कोटी रुपये उभारण्यात आले होते. यंदा आयपीओतून मोठी रक्कम उभारणाऱ्या कंपन्यांमध्ये तंत्रज्ञान कंपन्या आणि स्टार्टअपचा समावेश आहे. या कंपन्यांना गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

शेअर बाजारातून २०२१ मध्ये आतापर्यंत सरासरी दोन लाख कोटी रुपयांचा -२,०२,००९ कोटी रु. निधी उभारला असून २०२० मधील, १,७६,९१४ कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण खूप मोठे आहे. महत्त्वाचे म्हणजे २,०२,००९ कोटींपैकी ५१ टक्के किंवा १,०३,६२१ कोटी रुपये ताज्या शेअर विक्रीतून उभारले आहेत. तर ९८,३८८ कोटी रु. ऑफर फॉर सेलमधून उभारण्यात आले आहेत.

याआधी २०१७ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक ७५ हजार कोटी रुपये जमा झाले होते. पेटीएमने आतापर्यंतचा सर्वात मोठी आयपीओ आणला. याद्वारे कंपनीने १८,३००० कोटी रुपये उभे केले. तर Zomato ने ९,३७५ कोटी रुपये उभे केले होते. नुरेकाने उभारलेली सर्वात कमी रक्कम १०० कोटी रुपये होती. स्टार हेल्थने ७,२४९ कोटी रुपये उभे केले.

या वर्षीप्रमाणेच पुढील वर्षही आयपीओच्या दृष्टीने चांगले ठरू शकते. फेब्रुवारीपर्यंत ४५ कंपन्या त्यांचे आयपीओ आणू शकतात. यामध्ये स्टार्टअपचाही समावेश असेल. LIC चा २०२२ मध्ये सर्वात मोठा IPO असेल. हा आयपीओ मार्चपूर्वी आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र आतापर्यंत त्याचे मूल्यांकन व इतर प्रक्रिया सुरू आहे. यासोबतच ओला, बायजू, ओयो सारखे स्टार्टअप्सही बाजारात येण्याची तयारी करतील.

गेल्या तीन महिन्यांत तीन डझनहून अधिक कंपन्यांनी सेबीकडे आयपीओ आणण्यासाठी कागदपत्रे सादर केली आहेत. यामध्ये अदानी विल्मर, गो फर्स्ट एअरलाइन्स, ड्रूम टेक्नॉलॉजी, स्नॅपडील यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. अदानी विल्मर रु. ४५०० कोटी तर गो फर्स्ट रु. ३५०० कोटी उभारणार आहे. LIC ८० हजार कोटींवरून एक लाख कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) म्युच्युअल फंड कंपनी SBI Mutual Fund आता आयपीओ (IPO) आणण्याची तयारी करत आहे. आयपीद्वारे कंपनी ७५०० कोटी रुपये उभारू शकते. म्युच्युअल फंड उद्योगातील हा सर्वात मोठा IPO असेल. यासंदर्भात बँकेच्या मध्यवर्ती मंडळाची कार्यकारी समिती मंजुरीसाठी तयारी करत आहे. एसबीआय फंड हाऊसमधील ६ टक्के हिस्सा विकण्याची शक्यता आहे. SBI म्युच्युअल फंड हा म्युच्युअल फंड उद्योगातील सर्वात मोठा फंड हाउस आहे. नोव्हेंबरअखेरीस या फंडाची मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन (AUM) ६.३३ लाख कोटी रुपये होती. या वर्षी फेब्रुवारीमध्ये ती ५ लाख कोटी रुपये होते.

AUM म्हणजे कंपनीकडे गुंतवणूकदारांकडे असलेली रक्कम.  

आयपीओसाठी  कंपनी आपली जॉइंट व्हेंचर विदेशी कंपनी अमुंडीशीही चर्चा करत आहे. येत्या काही महिन्यांत हा आयपीओ आणला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे.

Check Also

नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाने मॉडेल करारात केल्या सुधारणा २७०० किलोमीटरचे महामार्ग उभारणार

नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने मॉडेल सवलत करारातील अलीकडील सुधारणांनंतर टोल, ऑपरेट आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *