Breaking News

पाकिस्तान : तेल उपलब्ध नसल्याने सरकारी विमान कंपनी पीआयए च्या ८१ पैकी ७० उड्डाणे रद्द पाकिस्तान ची सरकारी विमान कंपनी पीआयए तोट्यात नेमकं काय आहे कारण ?

पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सला तेलाच्या तीव्र टंचाईमुळे ८१ पैकी ७० उड्डाणे रद्द करावी लागली. पीआयएने हे विधान अशा वेळी जारी केले आहे जेव्हा पाकिस्तानच्या सरकारी तेल कंपनीने एक दिवस आधी सांगितले होते की त्यांना तेल पुरवठ्यासाठी $ २२० दशलक्ष अग्रिम पैसे मिळाले आहेत. हे तेल पीआयएच्या ३९ विमानांना देण्यात येणार होते. अशातच पीआयएने एक निवेदन जारी करून सांगितले की, त्यांना फक्त ४ विमानांसाठी तेल मिळाले आहे.

पीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, तेल न मिळाल्याने विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होत आहे. तेल कंपनीकडून पैसे न मिळाल्याने पाकिस्तान सरकारने पुरवठा रद्द केल्यामुळे पीआयएची उड्डाणे सातत्याने रद्द होत आहेत. पाकिस्तान सरकारला भारताच्या एअर इंडियाप्रमाणे पीआयने खाजगीकरण करायचे आहे. पीआयएचे सध्या मोठे नुकसान होत आहे आणि त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. पीआयए ने काळजीवाहू सरकारकडे २३ अब्ज रुपयांची मदत मागितली आहे जेणेकरुन विमान चालू ठेवता येईल.

यानंतर पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांनी पीआयएच्या आर्थिक पुनर्रचना आणि स्थिरीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, पीआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, ८१ नियोजित उड्डाणेंपैकी रविवारी फक्त ११ उड्डाणे चालू शकली. तेलाचे आगाऊ पैसे सरकारी तेल कंपनीला देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, पैसे देऊनही आम्हाला तेल देण्यात आले नाही, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात उड्डाणे बंद करावी लागली अशी माहिती त्यांनी दिली.

Check Also

हिंडेनबर्ग प्रकरणी सेबीच्या अदानीला दोनदा नोटीसा अदानी कंपनीने दिला सविस्तर खुलासा

अदानी एंटरप्रायझेसने गुरुवारी खुलासा केला की त्यांना सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *