Breaking News

“अँटनी” Antony चा भव्य टीझर १९ ऑक्टोबर रोजी होणार प्रदर्शित चित्रपटाचे नेत्र दिपवणारे चित्रीकरण रेनादिव्ह यांनी केले असून जेक्स बेजॉय यांनी मंत्रमुग्ध करणारे संगीत दिले आहे. तसेच श्याम शशिधरन यांनी संकलन केले आहे आणि आर जे शान यांचे मोलाचे सृजनशील सहकार्य चित्रपटास लाभले आहे.

मुंबई, 18 ऑक्टोबर: ‘अँटनी’ हा चित्रपट अत्यंत विलक्षण असून याआधी चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरला चित्रपट रसिक आणि समीक्षकांकडून प्रचंड प्रशंसा मिळाली आहे. प्रतिभावान चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक जोशी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अष्टपैलू पुरस्कार विजेता अभिनेता जोजू जॉर्ज आहे, तसेच कल्याणी प्रियदर्शन, चेंबा विनोद जोस आणि नायला उषा यांच्या प्रमुख भूमिका असतील. चित्रपटाचा एक भव्य टीझर १९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल आणि चित्रपट २३ नोव्हेंबर रोजी मल्याळम, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये संपूर्ण भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

चित्रपटाचे कथानक हे आकर्षक आणि अद्वितीय असून हृदय ढवळून काढणारे आहे. कथा ही अनोळखी नातेसंबंधांवर आधारित आहे. एक शांततापूर्ण गावात अँटनी आणि त्याचा मित्र राहत आहे. अँटनी एक जणाचा खून करतो आणि तिथे कथा वळण घेते. कथा जसजशी पुढे सरकते, तसतसे त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना विविध पात्रे भेटतात जी भावनिक बंधांची शक्ती ठळकपणे दर्शवतात. रक्ताची नाती आणि नात्यांतले गुंते या चित्रपटातून रसिक प्रेक्षकांना अगदी अनुभवता येणार आहेत.

‘अँटनी’ साठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मिपकॉम २०२३ मध्ये सध्या विक्रीच्या चौकशी सुरू असून अति उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘अँटनी’ नंतर अल्ट्राकडे आणखी दोन दक्षिण भारतीय चित्रपट असून ते पुढील तिमाहीत थिएटरमध्ये विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. यापूर्वी अल्ट्राने विविध भारतीय भाषांमध्ये ४० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. कंपनी आणखी उत्तम चित्रपटांसाठी दक्षिण भारतातील विविध चित्रपट निर्मात्यांशी चर्चा करत आहे.

चित्रपटाचे नेत्र दिपवणारे चित्रीकरण रेनादिव्ह यांनी केले असून जेक्स बेजॉय यांनी मंत्रमुग्ध करणारे संगीत दिले आहे. तसेच श्याम शशिधरन यांनी संकलन केले आहे आणि आर जे शान यांचे मोलाचे सृजनशील सहकार्य चित्रपटास लाभले आहे.

“या ड्रीम प्रोजेक्टचा एक भाग म्हणून आम्ही खूप उत्सुक आहोत. गेली चाळीस वर्ष आम्ही दक्षिण भारतीय चित्रपटांचा संग्रह करून जागतिक स्तरावर त्यांना विविध भाषेत प्रस्तुत करत आहोत. ‘अँटनी’ चित्रपट हा दक्षिण भारतीय सिनेसृष्टीत एक पाऊल असून पुढे जाऊन या पावलांच्या ठसा वाढवण्याच्या आमच्या बऱ्याच योजना आहेत.” अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे डायरेक्टर श्री. रजत अग्रवाल असे म्हणाले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

विशाखा सुभेदार ने मानले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार

संपूर्ण दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीही जल्लोषात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *