Breaking News

मराठी सिनेसृष्टीला मिळाला नवा सृजनशील संगीतकार रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याच्या वाटचालीत असणारा संगीतकार 'ऋषी.बी' आपल्या शब्दांनी आणि स्वरांनी महाराष्ट्रातल्या मनामनाचा ठाव घेण्यासाठी सिनेसृष्टीत जोमाने पदार्पण करत आहे.

मुंबई, 18 ऑक्टोबर  संगीत म्हटलं की स्वर आणि ताल यांचं विलक्षण मिश्रण आणि सृजनशील मिश्रण करणारे संगीतकार नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करत असतात. असाच एक संगीतकार ज्याने ‘थाटामाटात’ ‘माझ्या गोविंदा रे’ ‘ट्रिंग ट्रिंग’ सारख्या गीतांना स्वर आणि ताल देऊन लयबध्द केले तो म्हणजे ‘ऋषी.बी’.

रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याच्या वाटचालीत असणारा संगीतकार ‘ऋषी.बी’ आपल्या शब्दांनी आणि स्वरांनी महाराष्ट्रातल्या मनामनाचा ठाव घेण्यासाठी सिनेसृष्टीत जोमाने पदार्पण करत आहे.

‘इंटरनॅशनल फालमफोक’ या धमाकेदार मराठी चित्रपटाचे गीत ‘ऋषी.बी’ने शब्दबध्द आणि संगीतबद्ध केले असून सिद्धार्थ धेंडे, संकेत गुरव, श्रीधर खुडे यांच्यासमवेत चित्रपटास पार्श्वसंगीत दिले आहे. चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून प्रेक्षकांना चित्रपटातील गीतांचा विश्वनुभव मिळणार आहे.

Check Also

विशाखा सुभेदार ने मानले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार

संपूर्ण दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीही जल्लोषात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *