Breaking News

महायुती सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचा आशीर्वाद पाटीलला होता? विजय वडेट्टीवार यांचा सवाल आरोपीला पळायला कोणी मदत केली होती? काँग्रेसने उपस्थित केला सवाल

ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेला पळून गेलेला आरोपी ललित पाटील याला १५ दिवसांचा कालावधी होऊन देखील पोलिसांना शोध लागत नव्हता. अखेर ललित पाटील याला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुद्यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काही सवाल उपस्थित करत सरकारवर टिकेची झोड उठवली आहे.

वडेट्टीवार ट्वीट मध्ये म्हणतात, ससून रुग्णालय ड्रग्स प्रकरणातील आरोपी पाटील पंधरा दिवसांनी सापडला, पण असे अनेक “ललित” अजूनही मोकाट आहे. ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ चे रहस्य काय आहे हे राज्यातील जनतेच्या सामोरं यायला हवे. ललित पाटीलला तुरुंगात टाकून सर्व प्रकरण मिटले हा आव सरकारने आणू नये.

आरोपीला पळायला कोणी मदत केली होती ? महायुती सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचा आशीर्वाद पाटील ला होता? रुग्णालयातून ड्रग पुरवण्याचे धंदे कसे सुरू होते?ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे राज्यात कुठपर्यंत पोहोचले आहे… असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

Check Also

श्याम मानव यांचा मोठा गौप्यस्फोट: अनिल देशमुख यांनी दिला दुजोरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथपत्र द्या, नाही तर अजित पवार यांच्या विरोधात द्या

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *