Breaking News

अजित पवार म्हणाले, नाकाखालून नेलं, मग ते वेशभूषा बदलून जायचे ते काय होते? देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून अजित पवारांची टोलेबाजी

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून (सोमवार) नागुपरात सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज (रविवार) महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषदही झाली. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. अजित पवारांनी यावेळी सीमाप्रश्न, महापुरुषांचा होणारा अपमान, महाराष्ट्राबाहेर गेलेले उद्योगधंदे आदी मुद्यांवरून …

Read More »

या १६ मुद्यांवरून महाविकास आघाडीचा शिंदे सरकारच्या चहापानावर बहिष्कार सर्व पक्षियांनी पाठविले सहमतींने पत्र पाठविले

राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीसह सर्व विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारला आज पत्र पाठविले. या पत्रामध्ये मागील सहा महिन्याच्या काळात घडलेल्या गोष्टी राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देत विरोधकांनी विविध मागण्या केल्या आहेत. त्याचबरोबर या १६ मुद्यांच्या आधारावर राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आहे. यामध्ये …

Read More »

अजित पवार म्हणाले, आधी भाजपाच्या लग्नाचे वऱ्हाडी बघतो अन् मग बोलतो… राज्य सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

तब्बल दोन वर्षानंतर राज्याचे हिवाळी अधिवेशन पहिल्यांदाच नागपूरला होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारकडून आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी राज्यातील सर्व विरोधी पक्षियांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप,…भाजपाचा तो डाव कदापी यशस्वी होऊ देणार नाही महापुरुषांच्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीचा मुंबईत अतिप्रचंड महामोर्चा

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सीमावादाच्या प्रश्नाने डोके वर काढले असून सीमेवरची गावं शेजारच्या राज्यात जाण्याची मागणी करत आहेत. महापुरुषांचा अपमान, सीमावाद या प्रश्नावर महाराष्ट्रद्र्योह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा हा मोर्चा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला तेव्हापासून महाराष्ट्र एकसंध रहावा यासाठी प्रयत्न करण्यात आले पण ईडी सरकार …

Read More »

शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात दिला मोदी सरकारला इशारा ‌‌तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा व शिंदे गटाच्या काही नेत्यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज मुंबईत ‘महामोर्चा’चं आयोजन केले. या मोर्चाला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते, पदाधिकारी आणि लाखो कार्यकर्ते उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेला संबोधित करताना केंद्र …

Read More »

महामोर्चात उध्दव ठाकरेंचा इशारा, ज्यांनी डिवचलं त्यांच्या छाताडावर… बाळासाहेबांची शिकवण घेऊन जाऊ म्हणणारे तोतया

महाविकास आघाडीचा महामोर्चा सीएसटी येथे पोहोचल्यानंतर झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यपाल, भाजपा आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, बऱ्याच वर्षांनंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. जेव्हा ह्या मोर्चाची घोषणा केली, तेव्हा मला काही जणांनी विचारलं तुम्ही चालणार का? मी एकटा नाही, …

Read More »

महामोर्चात अजित पवार यांचा सवाल, या मागचा मास्टरमाईंड कोण? शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राविषयीच्या बेताल वक्तव्यावरून साधला निशाणा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह भाजपा नेत्यांनी शिवरायांबाबत केलेली वादग्रस्त विधानं, महागाई, बेरोजगारी आणि सीमाप्रश्नांसह विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी भाजपा-शिंदे गटाविरोधात आज महाविकास आघाडीकडून महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल या घोषवाक्याखाली महाविकास आघाडी आज रस्त्यावर उतरली होती. या मोर्च्याचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे करण्यात आला. यावेळी आयोजित सभेत …

Read More »

भाजपा म्हणते, राजकिय अस्तित्वाच्या संकटामुळे मविआचा महामोर्चा भारताच्या सामर्थ्यामुळे हताश पाकिस्तानचे मोदीजींविषयी वक्तव्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सामर्थ्यशाली झाला आहे. पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवाया करू शकत नाही तसेच भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची भारताची ताकद आहे. यामुळे हताश पाकिस्तानकडून मोदीजींविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्यात आले, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पुणे येथे केली. पाकिस्तानचे …

Read More »

संजय राऊत यांचे टीकास्त्र, त्यांची ताकद फक्त वागळे इस्टेट आणि पाचपाखडी पुरतीच.. त्यांच्या डोक्यात गांडूळाचा मेंदू नुसता वळवळत असतो

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी-देवता आणि संतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली आहे. या विधानाचा निषेध नोंदविण्यासाठी वारकरी संप्रदायाकडून आज १७ डिसेंबर रोजी ठाणे बंदची हाक दिली. या बंदला बाळासाहेबांची शिवसेना, भाजपा, अखिल हिंदू समाज आणि हिंदूत्वादी संघटनांनी पाठींबा देऊ केला. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत …

Read More »

बिल्कीस बानो प्रकरणातील ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली त्या ११ जणांना तुरुंगातून बाहेर सोडल्याप्रकरणाची केली होती याचिका

२००२ साली गुजरात दंगली दरम्यान घडलेल्या बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ दोषींची सुटका करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला होता. या निर्णयाविरोधात देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी बिल्किस बानो यांनीही या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका …

Read More »