Breaking News

नाना पटोले यांची टीका,…. फरकही पंतप्रधानांना कळू नये हे देशाचे दुर्भाग्य बजरंग बलीच्या आड लपून भाजपला ४० टक्के कमीशनचे पाप झाकता येणार नाही

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेचे मोठे समर्थन मिळत असून काँग्रेस पक्ष सत्तेत येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा सैरभैर झाला असून पराभव दिसत असल्याने ते आता धर्माच्या नावावर जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. कधी रामाच्या नावावर तर कधी बजरंग बलीच्या नावावर ते मतं मागत …

Read More »

निवड समितीने घेतला शरद पवार यांच्या “अ”-पेक्षे (विरूध्द) निर्णय, प्रफुल पटेल यांची माहिती राजीनामा एकमताने फेटाळला

दोन-तीन दिवसांपूर्वी आपल्या राजकिय आत्मचरित्राच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीसह पुढील भाग प्रसिध्द करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी समितीची घोषणा केली. त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याच्या फेरविचार करावा या मागणीसाठी मागील दोन तीन दिवसापासून नेत्यांसह, पक्ष कार्यकर्त्यांकडून …

Read More »

मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील तो प्रकार म्हणजे जातीभेदाला खतपाणी घालणारा रुग्णांना जात विचारण्याचा प्रकार तात्काळ थांबविण्याची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे अजित पवार यांनी केली मागणी

नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी, राज्य शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारा आहे. शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जावू नये. मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरु असतील तर ते तात्काळ …

Read More »

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता ऑनलाईन पध्दतीने आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांचे आदेश

आरोग्य विभागाची आस्थापना मोठी आहे. दरवर्षी बदली प्रक्रिया राबविताना अधिकारी – कर्मचाऱ्यांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे विभागाने प्रथमच ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विकसित केलेल्या ऑनलाईन प्रणालीचा उपयोग करून पारदर्शकपणे बदली प्रक्रिया राबवावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आज …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश,… तर मुंबईतील विकासकांवर कारवाई करा दादर परिसरातील पुनर्विकास रखडलेल्या ५६ प्रकल्पांसाठी नोडल अधिकारी नियुक्त

मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचा सर्वंकष आढावा घेऊन धोरण निश्चित करण्यात येईल,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विशेषतः दादर परिसरातील विकासकांमुळे रखडलेल्या ५६ प्रकल्पांबाबत नोडल अधिकारी तसेच आर्किटेक्ट नियुक्त करण्यात यावा. या प्रकल्पांचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटसह, विविध पर्याय तपासण्यात यावे. प्रकल्प रखडवणाऱ्या आणि विस्थापित झालेल्या कुटुंबांना …

Read More »

भाजपा-शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले “हे” निर्देश राज्यात सुरू असलेली विकासकामे 'मिशन मोडवर' पूर्ण करावित

राज्यात एकाबाजूला राजकिय भूकंप आणि उलथापालथींना मोठ्या प्रमाणावर वेग आलेला आहे. त्यामुळे राज्याच्या नेतृत्वात बदल होतोय की काय अशी चर्चा सातत्याने होत आहे. त्यातच शेजारील कर्नाटक राज्यातही विधानसभा निवडणूकांमुळे राजकिय वातावरण चांगलच तापलेले आहे. त्यामुळे राज्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि विधानसभा निवडणूका कधीही लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याची शक्यता …

Read More »

बार्टीसाठी केंद्रीय मंत्री आठवले, शिंदे गटाच्या तीन आमदारांसह ४ जणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र बार्टीचे प्रशिक्षण पूर्ववत सुरु करा

राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत देण्यात येणारे भरतीपूर्व प्रशिक्षण बंद केल्यामुळे समाजात नाराजीची भावना असून हे प्रशिक्षण लवकरात लवकर सुरु करून विद्यार्थाना न्याय देण्यात यावा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्यातील सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली. राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, विधिमंडळाचे विशेष अधिवेशन नाही बोलावले तर… मविआच्या वज्रमूठ सभा रद्द केल्या नाहीत, नैसर्गिक संकटामुळे सभांचे फेरनियोजन करु

राज्यासमोरील प्रश्नांसदर्भात राज्यपाल रमेश बैस यांची काँग्रेस शिष्टमंळाने भेट घेऊन दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत अशी विनंती करण्यात आलेली आहे. राज्याच्या हितासाठी राज्यपाल काँग्रेसच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करतील अशी अपेक्षा आहे. विशेष अधिवेशन बोलावले नाही तर काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी राज्यभर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, असा …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसची टीका,…मोदी सरकारचा महिला कुस्तीपटूंवर पोलिसी बळाचा वापर; तीव्र निषेध कनिष्ठ पदावर उच्चशिक्षित मुलं अर्ज करतात याचा अर्थ बेरोजगारी आटोक्यात आणण्यामध्ये भाजपासरकार फेल ठरलेय...

महिलांचा सन्मान आणि सुरक्षा करुन सरकार चालवू असे आश्वासन नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये देशातील जनतेला दिले होते. परंतु आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात आंदोलन करणार्‍या महिला कुस्तीपटूंवर पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा दिल्लीत जंतरमंतरवर जो प्रकार झाला त्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांनी विलासराव देशमुखांचा संदर्भ देत म्हणाले, मित्रापक्षाला सांगण्याऐवजी संजय राऊतांनी… संजय राऊत यांच्या गटाचा काँग्रेस हा मित्र पक्ष

बजरंग दलासारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणं म्हणजे एक प्रकारे देशद्रोह्यांनाच साथ देण्यासारखे आहे, असं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बेळगावात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना त्यांना याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. …

Read More »