Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसची टीका,…मोदी सरकारचा महिला कुस्तीपटूंवर पोलिसी बळाचा वापर; तीव्र निषेध कनिष्ठ पदावर उच्चशिक्षित मुलं अर्ज करतात याचा अर्थ बेरोजगारी आटोक्यात आणण्यामध्ये भाजपासरकार फेल ठरलेय...

महिलांचा सन्मान आणि सुरक्षा करुन सरकार चालवू असे आश्वासन नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये देशातील जनतेला दिले होते. परंतु आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात आंदोलन करणार्‍या महिला कुस्तीपटूंवर पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा दिल्लीत जंतरमंतरवर जो प्रकार झाला त्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, गेले दहा दिवस दिल्लीच्या जंतरमंतरवर महिला कुस्तीपटू आंदोलनाला बसल्या आहेत. काल मध्यरात्री पोलिसांनी पाऊस सुरु असताना लाठीचार्ज केला आणि शिवीगाळ करून आंदोलनाचा अधिकार मोडण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजपा सरकारच्या पोलीसांनी केलाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

या महिला कुस्तीपटूंना न्याय मिळावा, त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटावी आणि त्यांच्या मागण्यांवर यथोचित कारवाई व्हावी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे असेही महेश तपासे म्हणाले.

महेश तपासे म्हणाले, देशातील बेरोजगारीचा एक डेटा प्रसिद्ध झाला असून त्यात चार महिन्यांचा उच्चांक बेरोजगारीने मोडला आहे. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करु आणि देशात ‘अच्छे दिन’ आणू असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु दिवसेंदिवस पाहिले तर बेरोजगारीचा आलेख वाढतच चालला आहे. रोजगाराची संधी उपलब्ध नाही. कनिष्ठ पदावर उच्चशिक्षित लोक येऊ लागले आहेत. याचा अर्थ बेरोजगारी आटोक्यात आणण्यामध्ये भाजपासरकार फेल ठरले आहे असा आरोपही केला.

या देशातील बेरोजगारी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूर करु शकत नाहीत त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत देशातील सुशिक्षित तरुण बेरोजगार हा मोदींच्या भुलथापांना बळी न पडता भाजपला मतदान करणार नाही असा दावाही महेश तपासे यांनी केला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *