Breaking News

पंतप्रधान मोदी यांचे आव्हान, इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा

सत्ता मिळाली तर कलम ३७० पुन्हा स्थापित करणार, मोदी सरकारने आणलेला सीएए कायदा रद्द करणार, मोदी सरकारने तिहेरी तलाक प्रथेविरुद्ध आणलेला कायदा रद्द करणार आणि किसान सन्मान निधीतून शेतकऱ्यांना मिळणारा निधी रद्द करणार, मोफत धान्य योजना रद्द करणार असे काँग्रेस आणि इंडी आघाडीने जाहीर केले आहे. आम्ही देशातील ५५ कोटी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, शरद पवारांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला होता?

सहा वाजता तिसऱ्या टप्प्यातील मतदान बंद होत आहे. त्यामुळे आम्ही पाच वाजता पत्रकार परिषद घेत आहोत. आम्ही शरद पवार यांना विचारू इच्छितो की, चार दिवसांपूर्वी त्यांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला होता ? त्याचे कारण काय होते ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी …

Read More »

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी पाहिली तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात झाले आहे. तर सर्वात कमी मतदान सोलापूर लोकसभा मतदारसंघात झाले आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० …

Read More »

वंचितच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या वाहनावर हल्ला

वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात गाडीच्या समोरील काचा फुटल्या असून उत्कर्षा रूपवते सुखरूप असल्याची माहिती आहे. झाडीतून दगडफेक करत हा हल्ला करण्यात आला. दगडफेकीनंतर हल्लेखोर पळून गेले. शिर्डी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांचा जोरदार झंझावात सुरू …

Read More »

रमेश चेन्नीथला यांची खोचक टीका, मोदी ४०० पारच्या घोषणा देत फिरत होते, पण २००…

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे प्रचारक बनून ४०० पारच्या घोषणा देत देशभर फिरत होते. पण मुळात २०० पार होणे सुद्धा त्यांना जड जाणार आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पाहता ही गोष्ट त्यांच्या सुद्धा लक्षात आली आहे. मोदी कार्ड महाराष्ट्रात चालेल, अशी अशा भाजपवाले बाळगून होते. पण ती पूर्णपणे फोल ठरलेली आहे. …

Read More »

बारामतीत मतदानाच्या दिवशीच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, तर सोलापूरात तणाव

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या दृष्टीने उत्सुकता निर्माण झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढतीकडे सर्वाचे लक्ष्य लागून राहिलेले आहे. त्यातच आज सकाळपासून ११ लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र वास्तविक पाहता काल रात्रीपासूनच सुप्रिया सुळे समर्थक कार्यकर्त्यांनी आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर आज सातत्याने आरोप …

Read More »

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४२ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ७ मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले आहे. आज तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. आज सकाळपासून वातावरणात उष्मा राहिला असल्याने मतदार धीम्या गतीने बाहेर …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, जर अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन दिला तर…

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन द्यायचा की नाही यावर सर्वोच्च न्यायालय विचार करत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने मंगळवारी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांना अंतरिम सवलत फक्त त्या अटीवरच दिली जाईल की ते कोणतेही अधिकृत कर्तव्य …

Read More »

पालघरचे खासदार डॉ राजेंद्र गावित यांचा भाजपात प्रवेश

पालघरचे विद्यमान खासदार डॉ राजेंद्र गावित यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आशीष देशमुख आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खा राजेंद्र …

Read More »

तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्यात व्यवस्थापन लेखापालांची भूमिका महत्वाची

देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात व्यवस्थापन लेखापालांचे योगदान लक्षणीय आहे. तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट गाठताना, व्यवसाय सुलभता वाढविण्याच्या कार्यात व्यवस्थापन लेखापालांची भूमिका महत्वपूर्ण असेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन लेखांकन दिनाचे औचित्य साधून व्यवस्थापन लेखांकन व्यवसायाचे नियमन करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ …

Read More »