Breaking News

Editor

२६ जानेवारीला राजपथावर पुरोगामी महाराष्ट्राकडून शक्तीपीठांचा चित्ररथ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जय्यत तयारी

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट बोलल्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ चित्ररथावर साकारण्याचे काम दिल्ली येथे युद्धपातळीवर …

Read More »

अतुल लोंढेचा आरोप, दावोसमध्ये करार केलेल्या कंपन्यामध्ये महाराष्ट्रातीलच तीन कंपन्या दावोसमधून मोठी गुंतवणूक आणल्याची शिंदे सरकारची ‘बनवाबनवी’ उघड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून महाराष्ट्रात तब्बल १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा केला. परंतु यातील काही कंपन्या या महाराष्ट्रातीलच असून महाराष्ट्रात गुंतवतणूक करण्यासाठी दावोसला जाण्याची काय गरज होती असा सवाल विचारला जात आहे. महाराष्ट्रातील तीन कंपन्यांशी करार केलेला असून …

Read More »

एम.फील.अध्यापकांना मिळणार ‘कॅस’चे लाभ

११ जुलै २००९ पर्यंत सेवेत असताना एम. फिल. केलेल्या सर्व अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्यासंबंधी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मार्गदर्शन मागवून अशा सर्व अध्यापकांना लाभ देण्यात यावेत, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. एम. फील. अर्हता धारक अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य एम. फिल. पात्रताधारक प्राध्यापक …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, प्रगतीचं सरकार पण मोदींच्या मार्गदर्शनानुसार काम करतो… केंद्राच्या पाठबळाने मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज मुंबईत विविध विकासकामांचे उदघाटन होत असून यानिमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगूल वाजविले आहे. आजच्या लोकर्पणाच्या कार्यक्रमात मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत असताना महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोकांची …

Read More »

BMC-MMRDA चे हजारो कोटींचे अर्थसंकल्प तर पंतप्रधानांचे निधी कमी न पडू देण्याचे आश्वासन वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर मेट्रोसह अन्य विकास कामांचा शुमारंभ करताना दिले

मुंबईतील मेट्रो २ अ आणि ७ प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या विकासाला प्राधान्य असल्याचे सांगत भविष्यकाळातील विकासासाठी मुंबईला तयार करण्याचे काम …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, काही लोकांनी बेईमानी केली… मोदींमुळे नवा टेंड्र सुरू त्यांनीच भूमिपूजन केलेल्या प्रकल्पांचे मोदींनीच केले उद्घाटन

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे, मुंबई आणि नागपूरातील प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची चौथी वेळ आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही लोकांनी बेईमानी केली असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर नाव न घेता करत त्यामुळेच राज्यात मागील अडीच वर्षात लोकांच्या मनातील …

Read More »

मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेबरोबर २५ वर्षे भाजपाच सत्तेत होता हे मोदी कसे विसरले? शिवसेनेवर टीका करताना पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या पक्षालाच दोष दिला !: नाना पटोले

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील विकास कामांचे उद्घाटन करताना विरोधी पक्षांवर टीका केली. विरोधी पक्षाचे सरकार मुंबईचा विकास होऊ देत नव्हते, भ्रष्टाचार होत होता असा आरोप मोदींनी केला. परंतु मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षे शिवसेनेबरोबर भाजपाच सत्तेत सहभागी होता हे मोदींना माहित नाही का? शिवसेनेने विकास केला नाही किंवा भ्रष्टाचार …

Read More »

कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटन आणि दहिसर कांदळवनाचा विकास आराखडा सादर करा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश

कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तेथील पर्यटन सुविधांच्या बळकटीकरणासाठी वन विभागाने निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करावा, अशा सूचना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. तसेच कांदळवनाची उपयुक्तता सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी त्यासोबतचं कांदळवनाचा अनुभव घेता यावा यासाठी दहिसर येथील कांदळवन परिसरात ‘कांदळवन …

Read More »

फोटो व्हायरल केला म्हणून राखी सावंतला अटक शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी केली कारवाई

आपल्या वादग्रस्त वागण्याने आणि बोलण्याने नेहमी चर्चेत असलेल्या अभिनेत्री राखी सावंतला मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केली. एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याचा आरोप राखी सावंतवर करण्यात आला आहे. या प्रकरणी त्या मॉडेलने केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी कारवाई केली. या सदर मॉडेल महिलेचा फोटो राखीनं व्हायरल केला होता. अभिनेत्री शर्लिन चोप्रानं …

Read More »

सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यावरून साधला निशाणा हैद्राबादच्या उद्योजकांना दावोसला भेटण्याची गरज नव्हती

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौर्‍यावर येत असून या मुंबई दौऱ्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरही निशाणा साधला. महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्याने त्यांचे आम्ही स्वागतच करतो. या भाजपामध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली, यशवंत सिन्हा, सुषमा स्वराज यांच्यासारखे मोठे नेते पाहिले …

Read More »