Breaking News

Editor

राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांवर टीका, सर्वपक्षिय खासदारांसोबतची बैठक म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ केंद्रीय अर्थसंकल्पाला एक दिवस बाकी असताना बैठक बोलावली

केंद्रीय अर्थसंकल्पाला एक दिवस बाकी असताना विविध तरतुदींवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत महाराष्ट्राच्या सर्व खासदारांची बैठक बोलावणे म्हणजे वरातीमागून घोडे असेच म्हणावे लागेल अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तपासे म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. फक्त एक …

Read More »

भाजपा-शिंदे गटाच्या हिंदू मोर्चावर अजित पवार म्हणाले, छत्रपतींनी विविध जाती-समाजांना…. समाजात विष पेरण्याचे काम सुरु आहे

केंद्रात भाजपाचे तर राज्यात भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस सरकार असतानाही भाजपा-शिंदे गटाने सकल हिंदू समाजाच्या नावाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चा आज रविवारी मुंबईत काढला. या मोर्चावरून टीका टीपण्णी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपा-शिंदे गटावर निशाणा साधताना म्हणाले, लव्ह जिहादच्या नावाखाली जाती-समाजात तेढ निर्माण करण्याचा आणि जाती-जातीत …

Read More »

तिरंगा झेंडा फडकाविल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, आम्ही काढलेली यात्रा अजून संपली नाही.. यात्रेचा परिणाम काय होईल आताच सांगू शकत नाही

साधारणतः ६-७ महिन्यापूर्वी कन्याकुमारीपासून सुरु झालेली भारत जोडो आता काश्मीरात पोहोचली आहे. आज रविवारी ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा झेंडा फडकाविला. भारत जोडो यात्रेचा उद्या समारोप होणार आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी बोलताना म्हणाले, या यात्रेचा परिणाम काय होईल हे मी आत्ता सांगू …

Read More »

भाजपा-शिंदे गटाच्या हिंदू मोर्चावरून संजय राऊतांची टीका, मोदी-शाहचं राज्य आल्यापासून… रामसेवकांवर गोळ्या झाडणाऱ्या मुलायम सिंग यादवांचा पद्मविभूषण पुरस्कार गौरव

आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिंदे गटाकडून आज रविवारी सकल हिंदू समाज या नावाखाली मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चा काढत राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची मागणी केली. या मोर्चाबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या अनुषंगाने संपर्क साधला असता ते म्हणाले, मागील …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची मदत कृषी महोत्सवातून पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला पाठबळ

शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मागदर्शन मिळत आहे. याठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉलमुळे दुर्मिळ औषधी वनस्पतींची सर्वसामान्यांना माहिती मिळते आहे. या कृषी महोत्सवामुळे पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला मोठे पाठबळ मिळत असून आपले शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करणारे शासन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »

अखेर राहुल गांधी यांनी लाल चौकात फडकाविला तिरंगा झेंडाः खर्गेंचे अमित शाहना पत्र जवळपास ८ राजकिय पक्ष राहणार उपस्थित

भाजपाच्या हिंदूत्वादी राजकारणाला शह देण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि इतर सामाजिक संघटनांच्यावतीने धर्मनिरपेक्ष भारत एकच असल्याचा संदेश घेवून कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढण्यात आली. जवळपास सहाशे किलोमीटरहून अधिक अंतर आणि जवळपास ६ते ७ महिने ही भारत जोडा यात्रेने देशातील जवळपास बहुतांश भागातून जात काश्मीरातील लाल चौकात …

Read More »

अखेर कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणत भाजपाचा सत्यजीत तांबेंना पाठिंबा जाहिर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून तांबे पिता-पुत्राकडून केलेल्या राजकिय नाट्यामुळे काँग्रेस विरूध्द भाजपा असा सामना सुरु झाला. त्यातच या संपूर्ण खेळामागे भाजपाच असल्याची चर्चाही सुरु झाली. मात्र भाजपाकडून जाणीवपूर्वक सत्यजीत तांबे यांना जाहिर पाठिंबा केला जात नव्हता. अखेर आज सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून भाजपाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती …

Read More »

शिवसेना कुणाची? अजित पवार यांनी सांगितली ‘ती’ माहिती निवडणूक आयोगाची शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या अर्जावर उद्या सुनावणी

जवळपास ६ महिन्यांपासून शिवसेना कोणाची या मुद्यावरून एकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गटांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत असून या प्रश्नाचा वाद सध्या केंद्रिय निवडणूक आयोगासमोर आणि सर्वोच्च न्यायालयातही सुरु आहे. त्यातच केंद्रिय निवडणूक आयोगासमोर ३० जानेवारी रोजी या दोन्ही गटांच्या वादावर सुनावणी होत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

लिंगायत समाजाच्या मोर्चावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या, ऐकूनच घेत नसल्याने नागरिक रस्त्यावर धर्माला मान्यता द्या मागणीप्रश्नी लिंगायत समाजाचा आझाद मैदानावर मोर्चा

आज मुंबईत भाजपा-शिंदे गटाने आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनआक्रोश मोर्चा काढला. तर दुसऱ्याबाजूवा अखिल भारतीय लिंगायत समाज समन्वय समितीच्यावतीने मुंबईतील आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजाचा महामोर्चा काढला. या महामोर्चावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मोर्चाचा इशारा म्हणजे ते …

Read More »

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिंदे गटाकडून हिंदू जनआक्रोश मोर्चा शिवाजी पार्क ते परळच्या कामगार मैदाना दरम्यान काढला मोर्चा

नुकतेच इंडिया टूडे सी व्होटर या कंपनीने जारी केलेल्या सर्व्हेक्षण अहवालात भाजपा-शिंदे गटाच्या जागा कमी होताना दाखवून देत महाविकास आघाडीला जास्त जागा मिळणार असल्याचे भाकित केले. त्यावरून महाविकास आघाडीच्या गोटात समाधानाचे वातावरण असले तरी भाजपा-शिंदे गटाच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी पालिका निवडणूकातील आपल्या हिंदूत्वाचा खुंट्टा …

Read More »