Breaking News

Editor

अनुष्का शिकतेय विणकाम विवाहबंधनात अडकूनही नव्याच्या प्रयत्नात

मुंबईः प्रतिनिधी एखाद्या भूमिकेला अचूक न्याय देण्यासाठी काही कलाकार जीवाचं रान करतात. कधी कोणी ओरिजनल गेटअपमध्ये येण्यासाठी दाढी–मिशा वाढवतं, तर कोणी मुंडन करतं… कधी कोणी वाजवीपेक्षा जास्त वजन वाढवतं, तर कोणी आश्चर्यकारकरीत्या वजन घटवतं… कोणी नृत्याचे धडे गिरवतं, तर कोणी मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घेतं… पण नुकतीच विवाहबंधनात अडकलेली अनुष्का शर्मा …

Read More »

‘झिंगाट’च्या तालावर नाचवणार फराह खान मराठीतील झिंगाट हिंदीतही

मुंबईः प्रतिनिधी गाजलेल्या प्रादेशिक चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवून एखाद्या विषयाला मोठा कॅनव्हास मिळवून देण्याची परंपरा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये फार पूर्वीपासून सुरू आहे. यात मराठी चित्रपटही मागे नाहीत. ब्लॅक अँड व्हाइटच्या काळापासून मराठी चित्रपटांचे हिंदी रिमेक बनत आल्याचं इतिहासावर नजर टाकल्यास लक्षात येतं. असाच एक सुपरहिट मराठी चित्रपट मागील काही दिवसांपासून हिंदी …

Read More »

धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन झाले. धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केली. धर्मा पाटील यांना …

Read More »

भूमाफिया मंत्री रावल यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून ३०२ चा गुन्हा दाखल करा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी मंत्रिमंडळातील भाजपाचे मंत्री जयकुमार रावल हे भूमाफिया असून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोलाने खरेदी करायच्या आणि त्या करोडोच्या भावात विकायच्या हा त्यांचा वडीलोपार्जित धंदा आहे. त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या चार भावांची जमीन बळकावली आहे. धर्मा पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत धरुन जयकुमार रावल यांच्यावर कलम ३०२ चा गुन्हा दाखल …

Read More »

शेतकरी धर्मा पाटील यांना मृत्यूनंतरही भरपाईसाठी एक महिन्याची प्रतिक्षा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लेखी आश्वासन

मुंबईः प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांची अधिग्रहीत जमिनीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी दोन वर्षापासून पाठपुरावा करत होते. ही नुकसान भरपाई मिळावी यासाठी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र कठोर काळजाच्या सरकारला त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना तातडीने त्यांच्या जमिनीची नुकसान भरपाई द्यावी असे अद्याप वाटत नसून धर्मा पाटील यांचे वारस नरेंद्र …

Read More »

भारती विद्यापीठ, डि.वाय.पाटील, सिम्बॉयसिस विद्यापीठांसह अनेकांवर कारवाईचा बडगा स्वायत्त संस्थांना विद्यापीठ नाव वापरल्याबद्दल युजीसीकडून नोटीस

मुंबई: प्रतिनिधी काही वर्षांपूर्वी राज्यातील शैक्षणिक संस्थांना स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने गर्भश्रीमंत शैक्षणिक संस्थांना स्वायत्त शिक्षण संस्थांचा दर्जा दिला. मात्र या संस्थांकडून स्वायत्ततेचा अर्थ स्वतंत्र विद्यापीठ असल्यासारखा घेतल्याने नावात विद्यापीठ नाव वापरणाऱ्या भारती विद्यापीठ, डी.वाय पाटील, सिम्बॉयसिस विद्यापीठ, गोखले इन्स्टीस्टुशन, डेक्कन कॉलेज, टाटा सोशल सायन्स यासह राज्यातील २१ संस्थांवर …

Read More »

अखेर पोलिसी हेरगिरीच्या विरोधात राज्यपालांकडे लेखी तक्रार विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी हेरगिरी केल्याच्या प्रकारासंदर्भात राज्यपालांकडे लेखी तक्रार केल्याची माहिती एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. दोन दिवसापूर्वी अर्थात गुरूवारी विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे कर्मचारी अनधिकृतपणे माहिती घेत असल्याचे तसेच पत्रकारांची छायाचित्रे काढत …

Read More »

१५ फेबुवारी पर्यत खर्चाचा प्रस्ताव दिला तरच निधी मिळणार वित्त विभागाचे सर्व विभागांना आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या तिजोरीवर ताण पडत असल्याने विविध योजनांवरील खर्चात कपात करण्याचे धोरण राज्य सरकारने स्विकारले. त्यातच आता आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवसांचा अवधी राहील्याने किमान निर्धारीत केलेल्या निधीपेकीची काही रक्कम तरी विविध विभागांना खर्चायला मिळावी यासाठी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी पूर्वी वित्त विभागांला सादर करण्याचे आदेश सर्व विभागांना …

Read More »

सुहास जोशींसोबत खुलणार विक्रम गोखलेंच्या अभिनयाचा ‘गुलमोहर’ २९ जानेवारीला पाह्यला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी सध्या दूरचित्रवाहीनीवर सुरू असलेल्या ‘गुलमोहर’ या मालिकेत विविध गोष्टींच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावरील गाजलेले कलाकार छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पहिल्याच गोष्टीत मराठी सिनेरसिकांचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदे आणि गिरीजा ओक हे दोन कलाकार दिसले होते. आता या पुढील गोष्टीत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि सुहास जोशी …

Read More »

संविधानाच्या आडून सत्तेच्या मार्गावर जाण्याचा विरोधकांचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विरोधकांच्या संविधान बचाव रँलीवर टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी देशातील आणि राज्यातील भाजपच्या सरकारकडून सबका साथ सबका विकास यानुसार सर्वांना सोबत घेवून विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे यांच्या राजकिय पक्षाची दुकानदारी बंद होण्याची पाळी आल्याने विरोधकांकडून संविधान बचाव रँली सारख्या रँली काढत असून संविधानाच्या आडून सत्तेचा मार्ग चोखाळण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »