Breaking News

भूमाफिया मंत्री रावल यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून ३०२ चा गुन्हा दाखल करा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी

मंत्रिमंडळातील भाजपाचे मंत्री जयकुमार रावल हे भूमाफिया असून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोलाने खरेदी करायच्या आणि त्या करोडोच्या भावात विकायच्या हा त्यांचा वडीलोपार्जित धंदा आहे. त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या चार भावांची जमीन बळकावली आहे. धर्मा पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत धरुन जयकुमार रावल यांच्यावर कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा आणि त्यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस प्रवक्ते मवाब मलिक यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिंदखेडा मधील औष्णिक प्रकल्पाचे भूसंपादन हे २००९ मध्ये करण्यात आले त्यावेळी काही शेतकऱ्यांनी विरोध केला त्यामध्ये धर्मा पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचा विरोध होता. तसेच योग्य मोबदला मिळत नाही हे पाहून धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या नसून ती सरकारी हत्या असल्याचा आरोप त्यांनी केला.

१९७६ मध्ये भूसंपादन कायद्या नूसार एखादयाकडे ५० ते ५२ एकरच्यावर जमीन ठेवता येत नाही. तरी रावल यांच्याकडे दोंडाई येथे वेगवेगळी कुटुंब दाखवत ८०० एकर जमीन कशी काय असा सवाल करून रावल हे भूमाफिया सारखे काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांची जमीन कवडीमोलाने खरेदी करायची आणि करोडो रुपयांनी विकायची असा धंदा रावल आणि कंपनीचा सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

२००६ साली ४ हेक्टर जमीन बहाणे नावाचा गाव आहे तिथे पंचरत्ना रावल या नावाने संपादीत जमीन घेतली. त्या जमिनीवर १ कोटी रुपयांचा मोबदला घेतला याचे पुरावे आमच्याकडे आहेत. याबाबतची तक्रार मुख्यमंत्री, जिल्हयाचे पोलिस अधिक्षक आणि एसीबीकडे करण्यात आल्यावर कारवाईला सुरुवात झाली. मात्र मुख्यमंत्र्यांनी दबाव आणत ही कारवाई थांबवल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

शिंदखेडा आणि परिसरातील जमीन ही २००९ मध्ये भूसंपादीत झाली. कायदयाने नोटीफिकेशन निघाल्यानंतर जमीन खरेदी करता येत नाही. तरीही रावल यांनी १.७६ हेक्टर जमीन २० एप्रिल २०१२ ला २ लाख ८३ हजार रुपयांना खरेदी केली. कायदयाने नोटीफिकेशन झाले असताना रजिस्टारने दस्ताऐवज तयार केला कसा ? याचा अर्थ काही तरी गडबड आहे याची चौकशी करून संबधितावरही कारवा करावी अशी मागणी त्यांनी केली.

धर्मा पाटील यांच्या जमीन मोबदल्यासंदर्भात २२ जानेवारीला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनामध्ये बैठक ठेवण्यात आली होती. परंतु ती बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळेच धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली. त्यांची ही आत्महत्या नसून ती सरकारी हत्याच असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी पुन्हा केला.

एकनाथ खडसे यांना एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात मंत्रीमंडळातून काढण्यात आले मग रावल यांच्याविषयी तक्रारी असून मुख्यमंत्री का कारवाई करत नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दयायला हवे आणि खडसेंना जो न्याय लावला तोच न्याय रावल यांना लावणार का असा सवालही त्यांनी यावेळी केला. दरम्यान जमीन हडपण्याचा प्रकार २०१४ पूर्वी झाला असेल किंवा कोणत्याही काळात झाला असेल तर कुणालाही क्षमा न करता गुन्हा दाखल करा अशी आमची मागणी आहे.असे मलिक म्हणाले.

जयकुमार रावल हे दहशत पसरवित आहेत
जयकुमार रावल आणि त्यांची कंपनी एखादया भूमाफियासारखी दहशत पसरवत आहे. शेतकऱ्यांना सोडत नाहीच आहे शिवाय त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि त्यांच्या चार भावांची २७ एकर जमीन बळकावली आहे. आज माजी राष्ट्रपतींना न्यायालयात दाद मागावी लागत आहे इतका धुमाकुळ सुरु आहे.

दरम्यान, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेल्या आरोपांची दखल घेत, २०१२ साली आपण बाधित क्षेत्रातील २ एकर जमिन खरेदी केल्याचे मान्य करत हा व्यवहार जूना असल्याचा दावा केला. हा व्यवहार झाल्यानंतर २०१४ मध्ये ती जमिन महावितरणने प्रकल्पासाठी अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा केला

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *