Breaking News

Editor

पोलिस आयुक्तालयाला मंजूरी मात्र कार्यालयासाठी जमिनच नाही राज्य मंत्रिमंडळाची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या निर्मितीस मंजूरी

मुंबई : प्रतिनिधी गेली अनेक वर्षे पुणे शहराला लागून असलेल्या पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र महापालिकेची स्थापना केल्यानंतर स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर राज्य सरकारने या मागणीची दखल घेत पिंपरी चिंचवडला स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाच्या निर्मितीस मंजूरी दिली. परंतु या आयुक्तालयाच्या मुख्यालय उभारणीसाठी अद्याप जमिनच उपलब्ध करून न दिल्याने …

Read More »

अनुभव सिन्हांच्या आगामी सिनेमात श्रीया पिळगावकर अभी तो पार्टी शुरू हुई है सिनेमासाठी करारबध्द

मुंबई : प्रतिनिधी महागुरू सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची कन्या श्रीयाचं नाव सध्या बॅालिवुडपासून हॅालिवुडपर्यंत चांगलंच गाजतंय. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘एकुलती एक’ या सिनेमाद्वारे चंदेरी दुनियेत दाखल झालेल्या श्रीयाने अल्पावधीतच ‘उन प्लस उने’ या फ्रेंच सिनेमात आयन्ना ही व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारत शाबसकी मिळवली. त्यानंतर शाहरुख …

Read More »

आपलं शहर करा हरित स्वच्छ- सुंदर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व महापालिका, नगरपालिकांना पत्र पाठवित आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्यात वन विभागाने लोकसहभागातून महावृक्ष लागवड मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत शहरातील नागरिकांनीही सहभागी व्हावं आणि आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करावं,  असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी करत अशा आशयाचे पत्र राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिकांना,  नगराध्यक्ष, महापौर यांना पाठविले आहे. याच पत्रात त्यांनी शहरवासियांना देखील  वृक्ष …

Read More »

गुन्हेगारीमुळेच मी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलो गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांची स्पष्टोक्ती

मुंबई : प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्येच्या घटनेनंतर जिल्ह्यातले शिवसैनिक आक्रमक होते. मात्र त्यांना आता शिवसेनेच्या नेत्यांनी शांत केल्याचे सांगत शिवसेना आक्रमक आहे, पण गुन्हेगार नसल्याचे प्रमाणपत्र देत केवळ गुन्हेगारीमुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस हा गुंडाचा पक्ष असल्याची अप्रत्यक्ष आरोप गृह राज्यमंत्री …

Read More »

कोण घेणार स्पृहाची जागा? ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ नाटकात नवी अभिनेत्री पाह्यला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी काही मालिकांमध्ये काळानुरूप बदल होत असल्याचं आपण नेहमीच पाहात आलो आहोत. नाटकही याला अपवाद नाही. एखाद्या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारणारा कलावंत दुसऱ्या एखाद्या कामात गुंतला की त्याची जागा अन्य एखादा कलावंत घेतो आणि ‘शो मस्ट गो ऑन’ असं म्हणत नव्या टिमसोबत नाटकाची वाटचाल पुढे सुरूच राहते. चित्रपटांपासून …

Read More »

आदीवासी जमिन विक्रीच्या मान्यतेचे अधिकार आम्हाला द्या मंत्र्यांच्या बैठकीत महसूल विभागीय आयुक्तांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आदीवासी समाजाच्या शेत जमिनी विक्रीस मान्यता देण्याचे अधिकार राज्य सरकारकडे असले तरी सुज्ञ नागरीकांकडून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत फसवणूक करत त्यांच्या जमिनी बळकाविण्याचे प्रकार सर्रास घडताना दिसून येतात. तरीही आदीवासींच्या जमिन खरेदीस मान्यता देण्याचे अधिकार विभागीय स्तरावर देण्याची मागणी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महसूल …

Read More »

एव्हरेस्ट सर करायला निघाले १० जिगरबाज आदीवासी विद्यार्थी आदीवासी मंत्री विष्णू सवरा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शुभेच्छा सोहळा

चंद्रपूर : प्रतिनिधी कठोर परिश्रमाला यशाचा सुंगध असतो आणि उपजत गुणवत्तेला संधी मिळाली की आकाश मोकळे होते,  हा संदेश देणारा एक हृदयस्पर्शी सोहळा चंद्रपूरच्या जनतेने आज अनुभवला. जिल्हयातील आदिवासी शाळेतील १० विद्यार्थ्यांनी वर्षभर चाललेल्या खडतर आणि कठीण प्रशिक्षणानंतर एव्हरेस्ट सर करण्याचा संकल्प सोडला. हे १० विद्यार्थी १० एप्रिलपासून हिमालयाच्या पायथ्यापासून एव्हरेस्ट सर करायला …

Read More »

मोदी सरकारच्या कारभारा विरोधात काँग्रेसचे एक दिवसीय उपोषण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील भाजप सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिके आणि कारभारामुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या कारभाराच्या निषेधार्थ आणि देशात शांतता व सलोखा कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे उद्या ९ एप्रिल रोजी राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र …

Read More »

धनगर आरक्षण पेटण्याची शक्यता? रासप आणि राज्य सरकारबाबत धनगर ऐक्य परिषदेत भूमिका ठरणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचे जाहीर आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यास आता साडेतीन वर्षे झाली. त्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झाली करण्यात आली नाही. यापार्श्वभूमीवर येत्या २२ एप्रिलला सांगलीत धनगर ऐक्य परिषदेने समाजाचा महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळाव्यात धनगर …

Read More »

तुमची औकात तरी आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची सरकारवर टीका

सातारा- दहिवडी : प्रतिनिधी नुकत्याच मुंबईत झालेल्या भाजपच्या महामेळाव्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका करत चहावाल्यांच्या नादीला लागाल तर तुम्ही औषधालाही शिल्लक राहणार नसल्याची टीका केली. त्या टीकेचा खरपूस समाचार घेत पवार साहेबांचे बोट पकडून यांचे गुरु राजकारणात आले आणि हे भाजपचे …

Read More »