Breaking News

Editor

द. सोलापूरातील कोरोनाग्रस्तांवर कोणत्या पध्दतीने उपचार होतायत? मग वाचा तर कोविड केअर सेंटरमध्ये सकस आहार, योगासनाबरोबर संगीताचा होतोय वापर

सोलापूर : प्रतिनिधी  कोरोनाग्रस्तांना योग्य धीर दिला आणि त्यांचे समुपदेशन केले तर बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, असे सोलापुरात दिसून येत आहे. सकस आहार, स्वच्छता, करमणूक, योगासन आणि योग्य उपचार मिळाले तर कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. याची प्रचिती दक्षिण सोलापूर तालुक्याच्या केटरिंग कॉलेजमधील कोविड केअर सेंटरमध्ये येत आहे. हा पॅटर्न जिल्ह्यातील …

Read More »

कोरोना: पुण्यात ३ हजारावर रूग्ण तर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात १००हून अधिक ५७१४ बरे, ९६१५ नवे बाधित तर २७८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी मुंबईत आज १०५७ रूग्ण आढळून आले असून यापेक्षा दुपटीने पुणे शहरात २०११, जिल्ह्यात ३९७ आणि पिंपरी चिंचवडमध्ये ९७३ नवे बाधित रूग्ण आज आढळून आले आहेत. यापाठोपाठ सोलापूर शहर आणि जिल्ह्यातही रूग्ण अनुक्रमें ११५ आणि १८६ रूग्ण आढळून आल्याने या दोन जिल्ह्यातील …

Read More »

माजी सैनिकांना ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमा आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत हंडे यांची मागणी

कोल्हापूर : प्रतिनिधी राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून माजी सैनिकांची नियुक्ती करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत हंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हांडे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या विकासात सैनिकांचे योगदान अढळ राहिले आहे. ज्या ज्या वेळी देश संकटात …

Read More »

गणेशोत्सव येतोय ! कोकणातील प्रमुख रस्त्यांची डागडुजी तातडीने करा आढावा बैठकीत अशोक चव्हाण यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात अनेक चाकरमानी जातात. मात्र यंदा कोरोनामुळे कोकणात जाण्यासाठी रेल्वे सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र एसटी सुरु होण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक जण खाजगी बस आणि गाड्यांनी कोकणात जातात. कोकणाकडे जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख रस्त्यांचा आढावा घेऊन आवश्यकता असलेल्या …

Read More »

महिला लोकप्रतिनिधींशी झालेल्या असभ्य वर्तनाचा निषेध: आंदोलन तीव्र करणार बेस्टला भाजपाने दिला इशारा

मुंबई: प्रतिनिधी २३ जुलै रोजी भाजपचे मुंबई शहरातील नगरसेवक बेस्ट महाव्यवस्थापकांकडे वीज दरवाढ आणि नागरिकांची वीज तोडण्याच्या धमक्यांचा विरोध करण्यासाठी गेले असता यावेळी बेस्ट महाव्यवस्थापक आणि अन्य कर्मचाऱ्यांनी भाजप लोकप्रतिनिधींशी असभ्यवर्तन करत दुर्वव्यवहार केला. पोलिस बळाचा वापर करून घेराव मधून बेस्ट महाव्यवस्थापकांनी पळ काढताना, भाजपच्या महिला लोकप्रतिनिधींशी पोलिसांनी व अन्य …

Read More »

मृत्यू दर शून्यावर आणणे हेच उद्दिष्ट्य डॉक्टरांच्या टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्धार

मुंबई : प्रतिनिधी कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणे करून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच मृत्यू दर देखील झपाट्याने कमी होऊ शकेल. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत. त्यामुळे त्या झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यू दर …

Read More »

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी ९ ऑगस्टपर्यत अर्ज करा महामंडळाचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी मुंबई शहर-उपनगर जिल्हयातील मातंग समाजातील मांग, मातंग. मिनी मादीग, मादींगा, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी,१२ वी,पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडुन सरासरी ६० पेक्षा जास्त गुण असलेल्या …

Read More »

महाराष्ट्र निवडणूक आयोगाद्वारे भाजपाच्या सोशल मिडिया कंपनीचा वापर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कागदपत्रांसह सादर केले पुरावे

मुंबई : प्रतिनिधी २०१९ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीदरम्यान भारतीय निवडणूक आयोगाचे सोशल मीडिया वरील फेसबुक पेज हाताळणारी कंपनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची असल्याचं समोर आलं आहे. संबंधित व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता. निवडणूक आयोगाने निष्पक्ष संस्था म्हणून काम करणं अपेक्षित आहे. परंतु सदर प्रकार लोकशाहीमधील …

Read More »

प्रशासनात डॉक्टर सहकारी असल्याचा असाही विभागाला फायदा कर्मचाऱ्यांच्या शरीरातील अॅण्टीबॉ़डी स्टेट करून सुरक्षिततेची घेतली काळजी

मुंबई : विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेळोवेळी पावले उचलण्यात येत आहेत. या विषाणूच्या संसर्गाची लागण स्वत:लाही होवू नये यादृष्टीने अनेकजण पुरेशी काळजी घेत आहेत. तरीही या विषाणूची लागण काही जणांना होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर मंत्रालयातील उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील उपसचिव डॉ.श्रीकांत पुलकंडवार यांनी विभागातील …

Read More »

कोरोना: संख्या साडेतीन लाखाच्या जवळ तर अॅक्टीव्ह रूग्ण १.४० लाखावर ९८९५ नवे बाधित, ६४८४ जण घरी तर २९८ मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील २४ तासात ९८९५ नव्या बाधित रूग्णांचे निदान झाल्याने एकूण रूग्णांची संख्या ३ लाख ४७ हजार ५०२ वर तर बाधित रूग्णांची संख्या १ लाख ४० हजार ०९२ वर पोहोचली. याशिवाय ६४८४ जण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १ लाख ९४ हजार २५३ वर पोहोचली आहे. २९८ जणांच्या …

Read More »