Breaking News

Editor

मुंबई महानगरातील ८ महानगरपालिका व ७ नगरपालिकांसाठी स्वतंत्र एसआरए प्राधिकरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय

मुंबई: प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील (MMR Region) ८ महानगरपालिका आणि ७ नगरपालिकांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या प्राधिकरणाचे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे  (MMR-SRA) चे मुख्यालय ठाणे …

Read More »

शेखर चन्ने, तुकाराम मुंडे यांच्यासह १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या अण्णासाहेब मिसाळ कोकण विभागाचे नवे विभागीय आयुक्त

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आज प्रमुख १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून यात नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यासह शेखर चन्ने, अण्णासाहेब मिसाळ, लोकेश चंद्रा यांच्यासह अन्यांचा समावेश आहे. नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पदी करण्यात आली आहे. लोकेश चंद्रा यांची बदली जलसंधारण …

Read More »

कोरोना : राज्यात आणि देशात फक्त २ टक्क्यांचा फरक : बाधित संख्या ७ लाखावर १० हजार ४२५ नवे बाधित, १२ हजार ३०० बरे झाले तर ३२९ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी देशातील बरे होणाऱ्या रूग्ण बरे होण्याच्या तुलनेत महाराष्ट्र फक्त २ टक्क्याने मागे असून देशातील बरे होण्याचा दर ७५.९२ इतका आहे. तर राज्यातील बरे होण्याचे प्रमाण ७३. १४ इतके आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याचे दिसून येत आहे. काल १४ हजाराहून अधिक रूग्ण …

Read More »

महाडमधील त्या इमारतीतील ७८ व्यक्ती सुखरूप तर मृतकांची संख्या १० वर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध सुरु

महाड: प्रतिनिधी येथील तारिक गार्डन कोसळून झालेल्या दुर्घटनेत ९७ व्यक्तींपैकी ७८ व्यक्तींना बाहेर काढण्यात आले असून ते सुखरूप आहेत. या दुर्घटनेत संध्याकाळपर्यत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर उर्वरित व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. स्थानिक चौकशीनुसार इमारतीमध्ये एकूण ४१ सदनिका, १ कार्यालय, …

Read More »

विधानमंडळ पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे पण कोरोना मुक्त आमदारांनाच प्रवेश ७ आणि ८ सप्टेंबरला घेण्याचा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज मुख्यमंत्री …

Read More »

किमान झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व म्हाडाचे पैसे तरी परत भाजपा आ. अतुल भातखळकर यांची मागणी

मुंबईमधील झोपडपट्टी पुनर्वसनाचे शेकडो प्रकल्प प्रलंबित असताना व हजारो झोपडपट्टी धारकांचे भाडे थकलेले असताना त्यांच्या हक्काचे एक हजार कोटी रुपये चुकीचे निर्णय घेऊन इतरत्र वळविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्याचा आरोप करून अन्य महामंडळाचे नाही तर किमान झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व म्हाडाचे पैसे तरी परत करा अशी मागणी आमदार अतुल भातखळकर …

Read More »

बंदी घातलेले चीनी अॅप वापरतो महाराष्ट्र भाजप ‘गद्दार’ भाजपच्या चीन प्रेमाचा धिक्कार!: सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी मोदी सरकारने चीनी कंपन्यांच्या ऍप्स वापरावर भारतात बंदी घातलेली असताना त्यांचाच भारतीय जनता पक्ष अत्यंत निर्लज्जपणे बंदी घातलेली चीनी ऍप्स आजही वापरत असून भाजपाची ही कृती प्रचंड चिड आणणारी आहे. बंदी घातलेले चीनी ऍप वापरून भाजपाने चीनबद्दल आजही प्रचंड प्रेम असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपच्या बेगडी राष्ट्रप्रेमाचा …

Read More »

राज्यातंर्गत प्रवासावरील निर्बंध हटवा भाजपा उपाध्यक्ष माधव भांडारी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध काढून टाका अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. या बाबत भांडारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रसार थांबण्यासाठी अनेक अशा उपाययोजना राबवण्यात आलेल्या. त्याअंतर्गतच राज्यातंर्गत प्रवासावरही बंदी घातलेली. मात्र …

Read More »

कोरोना: आज विक्रमी रूग्ण बरे होवून घरी ११,०१५ नवे बाधित, १४ हजार २१९ बरे झाले, २१२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज १४ हजार २१९ इतके विक्रमी रूग्ण बरे झाल्याने बरे होवून घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या ५ लाख २ हजारापार गेली. तर ११ हजार ०१५ इतके नवे बाधित रूग्णांचे निदान झाल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या ६ लाख ९३ हजार ३९८ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ६८ …

Read More »

शिथिलता दिली मात्र सतर्क राहणे गरजेचे पालिकांनी कोरोना विरुद्ध लढताना दक्षता समित्यांचा प्रभावी उपयोग करावा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी शासन पालिकांच्या पाठीशी पण कोरोना रोखण्यात हलगर्जी नको. नागरिकांनी देखील आरोग्याचे सर्व नियम काटेकोरपणे  पालन तितकेच गरजेचे आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील पालिकांनी कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र करावा असे सांगत . लॉकडाऊन नंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली आहे. …

Read More »