Breaking News

Editor

आता घरीच जाणून घ्या आपल्या फुफ्फुसाचे आरोग्य फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का ? याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला असून त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच झालेल्या …

Read More »

कोरोना : बाधितांबरोबरच आता मृतकांची नोंदही सर्वाधिक ६८ हजार ६३१ नवे बाधित, ४५ हजार ६५४ बरे झाले तर ५०३ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत असून प्रादुर्भाव पसरण्याचे प्रमाणही जास्त आहे. काल ६७ हजार बाधित आढळून आल्यानंतर आज राज्यात पुन्हा ६८ हजार ६३१ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यतची ही सर्वाधिक संख्या आहे. तर राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ६ लाख ७० हजार …

Read More »

राज्याच्या गृहमंत्र्यांचा फडणवीस आणि भाजपाला इशारा पोलिसांवरील दबाव सहन करणार नाही- मंत्री वळसे-पाटील

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सध्या रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा असताना या औषधांचा मोठा साठा मुंबईत येणार असल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत काल रात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब देखील …

Read More »

केंद्राने साठेबाजी, काळाबाजार करण्याची फडणवीस व भाजपाला परवानगी दिलीय का? पोलीस कारवाईत अडथळा आणणाऱ्या फडणवीस, दरेकर व प्रसाद लाडविरोधात कारवाई करा- नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्या एका कंपनीच्या व्यवस्थापकाला व मालकाला ताब्यात घेतले असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी हस्तक्षेप करून पोलिसांवर दबाव टाकून त्याला सोडवले आणि तो साठा भाजपाने केंद्रीय मंत्र्यांच्या परवानगीने मिळवल्याचा दावा केला. वास्तविक रेमडेसिवीरचा साठा खाजगी व्यक्तीला करता येत नाही तर …

Read More »

कोंकणातील शिवाजी महाराजांचे किल्ले आणि कातळ शिल्पे होणार जागतिक वारसा ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा यूनेस्कोकडून तत्वत:स्वीकार

मुंबई : प्रतिनिधी युनेस्कोतर्फे जागतिक पातळीवर जनजागृतीसाठी दर वर्षी १८ एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, या वर्षी ‘जटिल भूतकाळ आणि विविधतापूर्ण भविष्य’ ही संकल्पना पुढे ठेऊन हा दिवस साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यामार्फत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत सादर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा यूनेस्कोने तत्वत: स्वीकार …

Read More »

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा नवाब मलिक यांना इशारा बालीश आरोप बंद करा, कोरोनाच्या संकटाकडे लक्ष द्या

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य माणसाला उपचारासाठी तडफडावे लागत असताना सत्ताधारी शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने आता तरी सामान्य माणसाच्या मदतीला धावावे आणि सातत्याने केंद्र सरकारवर बालीश आरोप करणे बंद करावे, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मंत्री नवाब …

Read More »

साठेबाजी करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजपा का घाबरली? राज्यात रेमडेसिवीरचा साठा मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न- नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी रेमडीसीवीरचा साठा करणार्‍या ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया याला बीकेसी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील भाजपा का घाबरलीय? राज्यातील भाजप वकिली करण्यासाठी का जातेय याचं उत्तर भाजपने जनतेला द्यायला हवे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक केली. रात्रीच्या वेळी पोलिस स्टेशनमध्ये दोन विरोधी पक्षनेते …

Read More »

कोरोना : अबब ६७ हजार बाधित…जाणून कोणत्या जिल्ह्यात किती रूग्ण ५३ हजार ७८३ बरे झाले, तर ४१९ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल आढळून आलेल्या रूग्णांपेक्षा आज ४ हजार अधिक रूग्णांचे निदान झाले असून आतापर्यंतची सर्वाधिक ६७ हजार १२३ इतकी रूग्ण संख्येवर पोहोचली आहे. मात्र बाधित रूग्ण आढळून येणाऱ्यांच्या तुलनेत ५३ हजार ७८३ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने राज्यातील बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या ३० लाख ६१ हजार १७४ …

Read More »

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीत सातत्याने वाढ होत आहे. तसेच या इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरु झाला. त्यामुळे आता हे इंजेक्शन बाधित रूग्णांसाठी माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी किंमतीवर कॅप लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयामुळे आता …

Read More »

महाराष्ट्रासाठी रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील ऑक्सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसीवीर तयार करण्यास मान्यता द्यावी, राज्यात दररोज ८ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी लसींचा पुरवठा व्हावा, आदी मागण्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्या. वाढत्या …

Read More »