Breaking News

Editor

शरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने घेतली माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी, व्यापारी वृत्तीचे समर्थन करणारे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक महाराष्ट्र सरकार आणणार आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक आणले जाईल, अशी माहिती महसूलमंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.  …

Read More »

‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ मध्ये भाग घ्यायचाय तर मग १५ जून पर्यत अर्ज करा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी लवकरच ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in/startup-week या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केले. दरम्यान सहभागासाठी अर्ज करण्याची मुदत …

Read More »

शिवसेना खासदार-आमदार म्हणाले मुख्यमंत्रीजी “हा कायदा आपल्या राज्यात नको” केंद्राचा आदर्श भाडेकरू कायदा राज्यात नको

मुंबई: प्रतिनिधी भाडेकरू नियंत्रण कायदा हा राज्य सरकारच्या अखत्यारीत असताना केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती. तसेच केंद्र सरकारचा हा भाडेकरू कायदा राज्यात लागू केला तर २५ लाखाहून अधिक नागरीक रस्त्यावर येतील अशी भीती शिवसेनेच्या आमदारांनी व्यक्त करत हा कायदा राज्यात लागू करू नका अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …

Read More »

मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांची नालेसफाईवरुन सत्ताधाऱ्यांवर टीका

मुंबई: प्रतिनिधी मान्सूनच्या पहिल्या पावसातच मुंबई महापालिकेने नालेसफाईचे केलेले दावे फोल ठरले असून मुंबईची दाणादाण उडाली. यावरुन भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. विधानसभेचे मुख्य प्रतोद आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलेय.. घरात पाणी घुसू लागलेय..नालेसफाई कधी १०७%..कधी १०४%… …

Read More »

अनुदानित वसतीगृहाच्या ८ हजार १०४ कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतीगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात १ जुलै २०२१ पासून वाढ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे वसतीगृह अधीक्षकांचे मानधन दहा हजार रुपये, स्वयंपाकींचे मानधन आठ हजारस रुपये, मदतनीस आणि चौकीदारांचे …

Read More »

मुंबई व परिसरातील पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा: ३ दिवस पावसाचा इशारा पाण्याचा निचरा आणि वाहतूक सुरळीत होईल असे पाहण्याचे यंत्रणांना निर्देश

मुंबई: प्रतिनिधी हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर  जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला. अतिवृष्टीची …

Read More »

आरोग्य विभागाची नवी भरती: २२०० हून अधिक पदे तातडीने भरणार ग्रामीण भागातील जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागामध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ११८ नविन आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मिती आणि ही पदे भरण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या आरोग्य संस्थांसाठी ८१२ नियमित पदे निर्माण करण्यास तसेच ११८४ कुशल मनुष्यबळ सेवा, २२६ अकुशल मनुष्यबळ सेवा असे एकूण …

Read More »

राज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’ पुनरुज्जीवन होऊन रोजगार वाढीला चालना- सुभाष देसाई

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या उद्योग विभागाने बंद उद्योगांसाठी विशेष अभय योजनेची तयारी केली आहे. सुक्ष्म, लघु, मध्यम वर्गवारीतील उत्पादक घटकांना ही योजना लागू असेल. या योजनेद्वारे बंद पडलेल्या उद्योगांचे पुनरुज्जीवन होऊन रोजगार वाढीला चालना मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. स्तावित अभय योजनेसंबंधी उद्योगांच्या सूचना समजून घेण्यासाठी आज देसाई यांच्या …

Read More »

पंतप्रधान-मुख्यमंत्री भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘केंद्राला भेटून फायदाच नाही’ महाराष्ट्राच्या हाती असलेल्या विषयांपेक्षा केंद्राकडे असलेल्या विषयांवर पाठपुरावा करणे केव्हाही चांगले!

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत महाराष्ट्राला मिळत असतेच. परंतु केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या विषयांवर पाठपुरावा केला तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा केवळ महाराष्ट्रापुरता आहे. देशातील अन्य राज्यात ते आरक्षण सुरक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्रालाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे मागासवर्ग आयोग गठीत करून पुढील कारवाई …

Read More »

“नवाज शरीफला भेटायला गेलो नव्हतो” मुख्यमंत्री-पंतप्रधान खाजगी भेट मुख्य भेटी आधी ३० मिनिटांची खाजगी भेट

नवी दिल्ली: विशेष प्रतिनिधी राज्यातील विविध प्रश्नांची त़ड लावण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. मात्र शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेण्याआधीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात एक खाजगी बैठक पार झाली. …

Read More »