Breaking News

Editor

शैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी, धार्मिकस्थळांसह याबाबत जिल्हापातळीवर निर्णय ‘ब्रेकिंग द चेनसाठी बंधनांचे विविध स्तर’ संदर्भात स्पष्टीकरण

मुंबई : प्रतिनिधी ‘ब्रेकिंग द चेन’साठी शासनाने ४ जून, २०२१ रोजी प्रसृत केलेल्या आदेशांबाबत आणखी स्पष्टीकरण करणारे एक परिपत्रक आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागातर्फे जारी करण्यात आले आहे. लोकल रेल्वेने प्रवास करण्यावर बंधने घालण्यासंदर्भात आणखी स्पष्टीकरण या परिपत्रकात देण्यात आले आहे. या बंधनांसंदर्भात प्रशासन आणि सामान्यांच्या मनातील शंकांचे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात नऊ मुद्दयांचे स्पष्टीकरण …

Read More »

कुठेही गर्दी, आरोग्याचे नियम तोडलेले चालणार नाही अन्यथा मोठे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जिल्हाधिकारी, आयुक्तांना स्पष्ट सूचना

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या (लेव्हल्स) ठरविल्या आहेत. त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत. तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी …

Read More »

लॉकडाऊन असा हवा की विषाणूमुळे नॉकडाऊन व्हायची वेळ येऊ नये मुख्यमंत्र्यांनी घेतली कोविड संदर्भात प्रमुख उद्योजक आणि चित्रपट-दूरचित्रवाणी निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोविडची दुसरी लाट आल्यानंतर राज्यातील सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला बंदी करण्यात आली होती. मात्र आता कोविड रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने राज्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निर्मात्यांनी राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून चित्रीकरणासाठी सावधानता आणि खबरदारी पाळायची आहे. तसेच ब्रेक दि चेन मधील नव्या वर्गवारी प्रमाणे …

Read More »

सेसच्या नावाखाली दरोडेखोरी करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन राज्यात एकाचवेळी एक हजार ठिकाणी आंदोलन करणार-नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी युपीए सरकार असताना पेट्रोलवर एक्साईज ड्युटी ९.४८ रुपये होती ती आज ३२.९० रुपये म्हणजे २५८ टक्के आहे. तर डिझेलवर ३.५६ रुपये होती ती आज ३१.८० रुपये म्हणजे ८२० टक्के वाढ. या एक्साईज ड्युटीतून मोदी सरकारने गेल्या ७ वर्षात तब्बल २० ते २५ लाख कोटी रुपयांची लुटमारी केली. …

Read More »

कोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर तीन महिन्यानंतर आज प्रथमच सर्वात कमी कोरोना रुग्णांचे निदान

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे  कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) गेल्या तीन महिन्यात आज प्रथमच ९५ टक्क्यांवर गेले आहे. आज दिवसभरात कोरोनाचे २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ५५ लाख २८ हजार ८३४ जण कोरोना मुक्त झाले आहेत. दरम्यान, तीन महिन्यात आज प्रथमच सर्वात …

Read More »

जाणून घ्या ब्रेक दि चेनअंतर्गत कोणते जिल्हे कोणत्या गटात सरसकट शिथिलता नाही, स्थानिक प्रशासन निकषानुसार निर्णय घेणार

मुंबई: प्रतिनिधी ब्रेक दि चेनचे आज काढण्यात आलेले आदेश हे निर्बंध हटविण्यासाठी नसून निर्बंधांबाबत विविध पाच पातळ्या (लेव्हल्स) निश्चित करण्यासाठी आहेत. या पातळ्यांच्या आधारे सबंधित स्थानिक प्रशासन आपापल्या भागासाठी निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेईल.या सुचना प्रशासनासाठी आहेत, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्या प्रमाणे निर्णय घेईल. कुणीही गोंधळू नये व इतरांना …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले अजित पवारांना माहिताय झोपेत सरकार कशी करतात ते अजित पवारांना दिले प्रतित्तुर

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावलेल्या टोल्याला प्रतित्तुर देत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, अजित पवारांना झोपेत सरकार कशी करतात ते माहिती आहे. पण टिकवता येत नाही. ५४ आमदारांच्या सह्यांच पत्र ड्रावरमधून कोणी काढलं? राज्यपालांना कुणी सांगितलं की ५४ आमदारांचा पाठिंबा आहे, अशाप्रकारे …

Read More »

… तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांची भीती

मुंबई: प्रतिनिधी रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपुर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली. देशाचा जीडीपी ७.५ मायनसमध्ये गेला ही सत्य परिस्थिती आहे. याचा अर्थ रिझर्व्ह बँकेकडून आकलन चुकीचे …

Read More »

BreakTheChain: सोमवारपासून पाच टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये असे निर्बंध शिथील होणार दुकांनासह करमणूक पार्क, चित्रपटगृह, जिल्हातंर्गत प्रवास सुरू सरकारकडून आदेश

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील १० दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. तरीही अपेक्षेइतकी रूग्णसंख्येत घट होत नसल्याने १५ जून पर्यत निर्बंधात वाढ करण्यात आली होती. परंतु ही मुदत पूर्ण होण्यापूर्वीच ७ जून २०२१ अर्थात सोमवारपासून BreakTheChain अंतर्गत निर्बंध शिथील करण्यास मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून …

Read More »

रेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट रिझर्व्ह बँकेकडून द्विमासिक धोरण जाहिर

मुंबई: प्रतिनिधी मागील दोन महिन्यापासून देशातील सर्वच राज्यांमध्ये झालेली कोरोना रूग्णसंख्येतील वाढ झाल्याने लॉकडाऊनची परिस्थिती यामुळे यंदाच्या द्विमासिक धोरणात रिझर्व्ह रेपो दर आणि कर्ज दरात रिझर्व्ह बँकेने कोणतीही वाढ न करता ती स्थिर ठेवण्यात आल्याची माहिती बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी देत अंदाजित विकास दरात एक टक्क्याने घट होणार असल्याचा …

Read More »