Breaking News

दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरी भागात तब्बल इतक्या वाहनांची बुकिंग दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर वाहनाच्या मागणीत वाढ

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसरा सणाला हिंदू धर्मात असून महत्त्व आहे. मंगळवारी दसरा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा मुहूर्त साधत मोठ्या शहरात सुमारे पंधराशे दूचाकी, चारचाकी वाहनांचे आरक्षण करण्यात आले आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तरुणांनी वाहन खरेदीला पसंती दिली आहे.

तर दोनशेच्यावर नागरिक नवीन घरात प्रवेश करतील, असे चित्र विविध शहरात दिसून येत आहे. यावेळी सणाच्या खरेदीसाठी पूर्वसंध्येला बाजारात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कापसासह नवीन हंगाम येत आहे. शेतकऱ्यांनी तो विकून दसरा सण साजरा करण्यावर भर दिला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हातात बोनस आला असून त्यांचा दसरा सुद्धा गोड झाला आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे पगार होण्यास काही दिवसांचा अवधी असला तरी अनेकांनी बऱ्यापैकी खरेदी केले आहे. बहुतांश नागरिकांच्या हातात पैसा असल्याने वाहन मार्केट, कपडे मार्केट, सुवर्ण बाजारासह विविध वस्तू खरेदीसाठी गेल्या काही दिवसांपासून मोठा उत्साह नागरिकांत आहे. विजयादशमी आनंदात जाण्यासाठी नवीन वस्तू खरेदी, सोने खरेदीवर, नवीन वास्तूत प्रवेशावर नागरिकांनी भर दिल्याचे चित्र दिसते.

Check Also

शेअर्स बाजारातून परदेशी गुंतवणूक काढूण घ्यायला सुरुवात

लोकसभा निवडणूक २०२४ चे आतापर्यंत तीन टप्पे पार पडले आहेत. मात्र या तिन्ही टप्प्यात मागील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *