Breaking News

भाजपच्या कर-नाटकीच्या विरोधात काँग्रेसचे लोकशाही वाचवा आंदोलन मुंबईत प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे

मुंबई : प्रतिनिधी

कर्नाटक राज्यातील सरकार स्थापनेवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या राजकिय कुरघोडींना मोठ्या प्रमाणावर ऊत आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे आजचा दिवस राज्यभरात लोकशाही वाचवा (प्रजातंत्र बचाओ) दिवस म्हणून पाळत जात असून लोकशाही विरोधी भाजप सरकारच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेसमोरील अमर जवान ज्योती जवळ करण्यात येत आहे. या आंदोलनात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, माजी खा. एकनाथ गायकवाड, माजी आ. चरणसिंग सप्रा, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते डी. राजा यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्तेही धरणे आंदोलनात सहभागी झाले.

Check Also

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *