Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मुंडेवर पलटवार, तुमचा प्रवास माहित आहे ना…. विरोधकांनाही दिले सडेतोड उत्तर

नगर परिषदेच्या नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधारीत विधेयक विधानसभेत सादर केले. या विधेयकावर बोलताना विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली. तसेच राष्ट्रवादीचे आमदार धंनजय मुंडे यांनीही खोचक शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली. या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, घसा खराब होईपर्यंत तुम्ही बोलले. मला तुमचा प्रवास माहिती आहे ना. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रेम, दया, करुणा दाखवली. मात्र परत परत दाखवता येणार नाही. मी कमी बोलतो अशा सूचक शब्दात धनंजय मुंडे यांना गर्भित इशारा दिला

अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांकडून सरकारवर वेगवेगळ्या माध्यमातून टीका केली जात आहे. विधिमंडळ इमारतीच्या पायरीवर उभे राहून विरोधक सरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत. याच मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. आम्ही बहुमताच्या जोरावर कुठलेही काम करणार नाही. पण विरोधक बेंबीच्या देठापासून ओरडत आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले आहेत. विरोधी पक्षाचा मान ठेवून आम्ही बहुमताच्या जोरावर कुठलेही काम करणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी ठरवले आहे. असे असले तरी विरोध केला जात आहे. ‘ताट वाटी चलो गुवाहाटी’ अशा घोषणा परवा दिल्या गेल्या. जोरात घोषणा दिल्या जात होत्या. बेंबीच्या देठापासून ओरडत होते, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *