Breaking News

संत तुकाराम महाराज देहू संस्थानची मागणी; केतकी चितळेवर गुन्हा दाखल करा देहू रोड पोलिस ठाण्यात पत्र देत केली मागणी

संत तुकारामांच्या रचनेसारख्या पध्दतीचा वापर करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अत्यंत हिन भाषेत वैयक्तीक टीका करणारी पोस्ट अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टवर शेअर केली. त्याच्यावरून कळव्यात काल गुन्हा दाखल होवून तिला अटक केल्यानंतर आज चितळेवर पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा अशी मागणी संत तुकाराम महाराज देहू संस्थानने पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्यात एक पत्र देत मागणी केली.

केतकी चितळे हिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये संत तुकारामांच्या नावाचा वापर केला असून त्यामध्ये तुका म्हणे आता असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या नावाचा दुरूपयोग केला. त्यामुळे चितळे हिच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.

तुका म्हणे ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगाची स्वाक्षरी आहे, असे पोलिसांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या तुका म्हणे शब्दांचा वापर करून वादग्रस्त लिखाण केलेल्या केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अस पत्र देहू संस्थाने पिंपरी-चिंचवड पोलिसांना दिलं आहे. केतकीने तुका म्हणे शब्दांचा वापर करून विटंबना, वादग्रस्त लिखाण केले. श्री संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. तुका म्हणे ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगाची स्वाक्षरी आहे, असे पत्रात संस्थानच्यावतीने नमूद केले आहे. त्यामुळे तुकोबाच नव्हे तर देशातील इतर संतांच्या नावाचा वापर यासाठी करू नये. तसेच असे लिखान करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही देहू संस्थांनने आपल्या पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, केतकी चितळे हिच्या विरोधात कळव्यानंतर मुंबईतील भोईवाडा पोलिस ठाण्यासह राज्याच्या विविध ठिकाणी ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आज ठाणे सुट्टीकालीन न्यायालयात चितळे हिला हजर करण्यात आले असता तिला १८ तारखेपर्यत पोलिस कोठडी सुणावली आहे. मात्र चितळे हीने कोणताही वकील घेण्याऐवजी स्वत:च तीने तिची बाजू न्यायालयात मांडली.

Check Also

­­पुणे मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराविरोधात तक्रार

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने केलेल्या निवडणूक आचारसंहितेच्या गंभीर उल्लंघनाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *