Breaking News

‘बहुत याराना लगता है’ म्हणत बॉबस्फोटातील आरोपी आणि फडणवीसांचा “तो” व्हिडिओ शेअर भाजपावर आता काँग्रेसकडूनही हल्लाबोल

मराठी ई-बातम्या टीम

मागील काही दिवसांपासून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून आरोपांची राळ उडविल्यानंतर आता काँग्रेसनेही भाजपावर हल्लाबोल चढवित मालेगांव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि सध्या जामीनावर बाहेर असलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहीत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘बहुत याराना लगता है’ अशी कॉमेंट लिहीत आज ट्विटरवरून शेअर केला.

भाजपाचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नातील हा व्हिडिओ असून या लग्नाला भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. हे सर्व नेते एकाबाजूला बसून स्नॅक्स खात बसले असताना मध्येच एक व्यक्ती फडणवीस यांना काही सूचना करतो आणि त्यानंतर एक व्यक्ती पुढे येते. देवेद्र फडणवीस हे लगेच आपल्या जागेवरून उठून त्या व्यक्तीशी हस्तांदोलन करताना त्या व्हिडिओत दिसत आहेत.
फडणवीस ज्यांच्याशी हस्तांदोलन करत आहेत ती व्यक्ती दुसरी –तिसरी कोणी नसून मालेगांव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहीत असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. तसेच त्या व्हिडिओच्या पोस्टवर बहुत याराना लगता है अशी कॉमेंट लिहील्यानंतर शंका व्यक्त करणारा इमोजीही सचिन सावंत यांनी पोस्ट केला आहे.

याबाबत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना विचारले असता ते म्हणाले की, हा एक युएपीएचा आरोपी आहे. अत्यंत गंभीर घटनेत सहभागी असलेल्या आरोपीसोबत इतकी घनिष्टता असल्याचे दिसत आहे. भाजपाने ज्याप्रकारे साध्वी प्रज्ञा यांना राजमान्यता देत तिकीट दिले त्यामुळे भाजपाचे या प्रकरणातील संबंध किती मोठ्या प्रमाणात होते हे वेळोवेळी दिसत असून या भेटीतून हे अधोरेखित होत आहे. यांच्यात खूपच मैत्री असल्याचं दिसते.

तर भाजपा उपाध्यक्ष प्रसाद लाड म्हणाले की, माझ्या मुलीच्या लग्नात सचिन सावंत आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. अशाप्रकारे लग्नसोहळ्यात विकृतीची बुद्धी दाखवण्याचे काम काँग्रेसने केले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कर्नल पुरोहित माझे मित्र असून मला त्यांचा अभिमानही आहे. न्यायालयात खटला सुरु असताना ते पुन्हा लष्करात रुजू झाले आहेत. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला आरोपी म्हणत नाहीत. अशाप्रकारे विकृत बुद्धीने ट्वीट करु नये. मित्र म्हणून मी त्यांना बोलावलं होतं. पण अशाप्रकारे लग्नात कोण येतं त्यांचे फोटो, व्हिडीओ काढणं ही विकृती आहे. त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाल्यास त्यावर प्रतिक्रिया देईन.

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, सत्तापिपासून भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय काय?

मुंबईमध्ये होर्डींग दुर्घटना घडली आहे. भ्रष्ट महायुतीमुळे या दुर्घटनेत १८ जणांना जीव गमवावा लागला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *