Breaking News

भाजपा मुख्यमंत्र्यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, “राहुल गांधी म्हणजे आधुनिक जीना” उत्तरखंडमधील प्रचार सभेत हेमंत बिस्व शर्मांचे यांचे वक्तव्य

मराठी ई-बातम्या टीम

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत आधुनिक काळातील मोहम्मद अली जानी अशी उपरोधिक टीका केली. कालही त्यांनी तुम्ही राजीव गांधी यांचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला का? अशी खालच्या पातळीवर येवून टीका केली. त्यानंतर आज पुन्हा केलेल्या विधानामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

आमचे लष्करी जवान शत्रूच्या प्रदेशात कोणत्याही कारवाईसाठी जाण्यापूर्वी एक महिन्यासाठी योजना आखतात, या धोरणात्मक कारवाया असतात आणि कारवाई झाल्यानंतर प्रेस रिलीझ जारी केले जाते, त्यानंतर आम्हाला कळते. जर कोणी कारवाईचा पुरावा मागत असेल तर असा पुरावा मागितल्यावर लष्कराच्या जवानाला किती वेदना होतात याचा विचार करा असे वक्तव्य त्यांनी काल शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते.

राहुल गांधींना असे वाटते की भारतात गुजरात ते पश्चिम बंगालचा समावेश आहे, गेल्या दहा दिवसांपासून मी असे प्रकार पाहतोय. एकदा त्यांना भारत राज्यांचा संघ वाटतो, तर दुसऱ्यांदा भारतात केवळ गुजरात ते बंगालपर्यंत आहे. ते वाटेत ते बोलताहेत म्हणून मी म्हणतोय की राहुल गांधींमध्ये जिनांचं भूत शिरलंय. जिना जी भाषा १९४७ पूर्वी वापरत असत ती आता राहुल गांधी वापरत आहेत. एक प्रकारे राहुल गांधी आधुनिक काळातील जीना आहेत असे ते म्हणाले.

उत्तराखंडमधील एका प्रचारसभेत १२ फेब्रुवारी रोजी हेमंत बिस्व शर्मा यांनी तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही? याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला आहे का?, असा उपरोधिक सवाल केला होता. तसेच आपल्या देशाच्या लष्कराने पाकिस्तानात बॉम्ब फोडला असे म्हटले तर ते फोडलेच आहेत असे ते म्हणाले.

त्यांची मानसिकता पाहा, देशाचा अभिमान, जनरल बिपिन रावत यांच्या नेतृत्वाखाली लष्कराने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केले. त्यावर राहुल गांधींनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले असेही ते म्हणाले होते.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *