Breaking News

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर पलटवार, “मला त्यांचे हसू येते…” त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला का?

मराठी ई-बातम्या टीम

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पलटवार करत काँग्रेसवर टीका केली. तसेच काल एका खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी राहुल गांधी हे ऐकत नाहीत त्यामुळे मी त्यांना उत्तर कसे देणार असा खुलासा केला होता. त्यावर राहुल गांधी यांनी उत्तराखंड निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील त्यांचा पूर्ण वेळ काँग्रेसबद्दल बोलण्यासाठी दिला. पण त्यांनी चीनबाबत मी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातल्या मंगलौरमध्ये ते प्रचारसभेत बोलत होते.

त्यांच्या मुलाखतीमध्ये मोदी म्हणतात ‘राहुल गांधी ऐकत नाहीत’. तुम्हाला याचा अर्थ कळला का? याचा अर्थ ईडी किंवा सीबीआयचा दबाव राहुल गांधींवर काम करत नाही. (त्यांना म्हणायचंय) राहुल गांधी माझं ऐकत नाहीत. मी त्यांच्यावर कितीही दबाव टाकला, तरी ते मागे हटत नाहीत. ते ऐकत नाहीत असा त्यांच्या मुलाखतीतील बोलण्याचा अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.

मी मोदींचं का ऐकू? असा प्रतिप्रश्न करत राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदींनी नोटाबंदी, जीएसटीच्या माध्यमातून देशातील लघु आणि मध्यम उद्योजक, शेतकरी आणि कामगार यांचे मोठं नुकसान केले आहे. मी त्यांना घाबरत नाही. त्यांच्या उद्धटपणामुळे मला हसू येते असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

दरम्यान आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना तिसऱ्या दिवशीही काँग्रेसवर टीका केली. मात्र आजच्या भाषणात त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यावर आणि त्यांच्या धोरणावर सडकून टीका केली. विशेषत: त्याकाळी देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवर पंडित नेहरूंचे उत्तर काय होते ते वक्तव्यच त्यांनी राज्यसभेत वाचून दाखविले.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *